नागपूर :  सीएसआयआर-नीरीचे तत्कालीन संचालक डॉ. राकेश कुमार आणि संस्थेच्या चार शास्त्रज्ञांवर केंद्रीय तपास यंत्रणेने गुन्हे दाखल केल्यानंतर नीरीमध्ये खळबळ उडाली आहे. डॉ. राकेश कुमार नीरी नागपूरचे संचालक असताना त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. पावसाळ्यातच अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या छाटणे, पात्र कर्मचाऱ्यांऐवजी नातेवाईकांनाच प्राधान्य देण्याचा प्रकार त्यांनी केला. आधी नीरीमधील अनेक पदांवर रिक्त जागा सोडल्या आणि नंतर मुलाखतींमध्ये त्यांच्या दूरच्या नातेवाईकांना आणि ओळखीतल्यांना नोकऱ्या दिल्या. अनेक दिवसांपासून वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेमध्ये याबाबत तक्रारी केल्या जात होत्या.

हेही वाचा >>> सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पायपीट थांबणार, ही आहेत कारणे

cbi conducted raids of neeri offices in nagpur
१०० कोटींचा घोटाळा; नागपुरातील ‘नीरी’मध्ये सीबीआयचा छापा
maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?
pooja khedkar ias news in marathi
IAS पूजा खेडकर यांचे कारनामे दिल्लीपर्यंत पोहोचले; थेट पंतप्रधान कार्यालयानं घातलं लक्ष, LBSNAA नंही मागवला अहवाल!
IAS Pooja Khedkar father Dilip Khedkar
Pooja Khedkar Father First Reaction : IAS पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या मुलीने चूक…”
Principal Accountant General Office has provided many facilities for retired employees using digital system Nagpur
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पायपीट थांबणार, ही आहेत कारणे
vivek oberoi says after bollywood ostracized him he focused on business
बॉलीवूडने बहिष्कार टाकल्यावर व्यवसाय करून घर चालवलं; विवेक ओबेरॉय वस्तुस्थिती मांडत म्हणाला, “आज २९ कंपन्यांमध्ये…”
IAS Pooja Khedkar WhatsApp Chat Pune Collector Office
Pooja Khedkar Chat : “सर्व व्यवस्था करून ठेवा…”, पूजा खेडकर यांचे ‘ते’ व्हॉट्सॲप चॅट व्हायरल
IAS Puja Khedkar
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरचा आणखी एक प्रताप समोर; दिव्यांग असल्याचे सांगून UPSC परीक्षेत मिळवली सूट

सीएसआयआरनेही या प्रकरणाची चौकशी केली. अनेक महिने चाललेल्या या तपासणीत काही गैरप्रकार उघडकीस आले. यामध्ये डॉ. राकेश कुमार यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात अशा अनेक संशोधनांवर पैसे दिल्याचा आरोप करण्यात आला होता. संशोधनाच्या नावाखाली केवळ त्यांचे आराखडे बनवले गेले, कागदपत्रे तयार केली गेली. विभागात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून त्यातील खर्चावरही आक्षेप घेण्यात आले. नीरीमधील तक्रारींच्या चौकशीत आरोप सिद्ध झाल्यानंतर ९ एप्रिल २०२१ मध्ये त्यांना संचालक पदावरून काढण्यात आले आणि सीएसआयआर दिल्लीच्या मुख्यालयात पाठवण्यात आले. डॉ. राकेश कुमार यांच्याविरोधात त्यांचेच कर्मचारी उघडपणे समोर आले होते. काहींनी नावे घेऊन तक्रारी केल्या होत्या तर काहींनी अधिकृतपणे तपासात सहभाग घेतला होता. या संपूर्ण प्रकरणातील विशेष बाब म्हणजे, डॉ. राकेश कुमार ३० एप्रिल २०२४ला सेवानिवृत्त होणार होते. मात्र, त्याआधीच २७ एप्रिल २०२४ला त्यांना निलंबित करण्यात आले. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद नवी दिल्ली यांनी निलंबनाचा आदेश दिला. डॉ राकेश कुमार यांनी निलंबनाला आव्हान देण्यासाठी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात धाव घेतली होती.