माझ्या जातीत आरक्षण नाही आणि मला आरक्षण पाहिजे नाही. समाजाच्या नावावर राजकारण करणाऱ्या कुठल्या नेत्यांनी समाजाचे भले केले आहे? असा प्रश्न उपस्थित करत माणूस हा जात किंवा धर्माच्या नावावर मोठा होत नाही तर गुणांच्या आधारे मोठा होत असतो, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

चर्मकार सेवा संघाच्यावतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी गडकरी बोलत होते. शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रम ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार मोहन मते, आमदार नरेंद्र भोंडेकर, अशोक विजयकर, भैय्यासाहेब बिघाने, पंजाबराव सोनेकर, कैलाश चंदनकर पदाधिकारी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, आरक्षण मिळाले पाहिजे. त्याला माझा विरोध नाही. मात्र, आरक्षणामुळे समाजाच्या किती लोकांना फायदा झाला याचा समाजाने विचार केला पाहिजे.

अमरावती : शिवाजी शिक्षण संस्थेवर हर्षवर्धन देशमुख गटाचा झेंडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या समाजातून चांगले डॉक्टर, इंजिनियर, वकील झाले पाहिजे. माझ्याबाबतच बोलायचे झाल्यास मला नोकरी कर म्हणून घरी आग्रह केला जात होता पण त्यावेळी मी नोकरी करणारा नाही तर नोकरी देणारा होईल असे सांगितले होते आणि आता ५० हजार लोकांना रोजगार दिला आहे. त्यात माझ्या जातीचे ५० लोक सुद्धा नाहीत. मी जातपात पाळत नाही आणि सर्व जातीधर्माच्या लोकांना मदत करतो. मत द्यायचे असेल तर द्या, नाही तर नका देऊ, असे मी सांगतो. लोकही मलाच मत देतात, असेही गडकरी म्हणाले.