अमरावती : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्‍त प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे २० विशेष गाड्या चालवणार आहे.

१) नागपूर-अकोला-नागपूर विशेष गाड्या-(२ सेवा)

०११३२ विशेष गाड्या २ ऑक्टोबर रोजी १८.४० वाजता नागपूरहून निघतील आणि त्याच दिवशी २३.३० वाजता अकोला येथे पोहोचतील.

०११३१ विशेष गाडी ३ ऑक्टोबर रोजी अकोला येथून ००.२० वाजता निघेल आणि त्याच दिवशी ०४.५० वाजता नागपूर येथे पोहोचेल. -(१ सेवा)

२) सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी अनारक्षित स्पेशल-(२ सेवा)

०१०१९ अनारक्षित स्पेशल गाडी १ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल. -(१ सेवा)

०१०२० अनारक्षित विशेष गाडी २ ऑक्टोबर रोजी २२.३० वाजता नागपूरहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी १७.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. -(१ सेवा)

३) पुणे – नागपूर-पुणे अनारक्षित विशेष गाडी-(२ सेवा)

०१२१५ अनारक्षित विशेष गाडी ०१ ऑक्टोबर रोजी दुपारी २.५० वाजता पुण्याहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता नागपूरला पोहोचेल. -(१ सेवा)

०१२१६ अनारक्षित विशेष गाडी ०२ ऑक्टोबर रोजी २३.०० वाजता नागपूरहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी १६.२० वाजता पुण्यात पोहोचेल. -(१ सेवा)

४) सोलापूर-नागपूर-सोलापूर अनारक्षित विशेष गाडी-(२ सेवा)

०१०२९ अनारक्षित विशेष गाडी ०१ ऑक्टोबर रोजी ०९.५० वाजता सोलापूरहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी ०५.१० वाजता नागपूरला पोहोचेल. -(१ सेवा)

०१०३० अनारक्षित विशेष गाडी ०२ ऑक्टोबर रोजी नागपूरहून २३.३० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी २३.४५ वाजता सोलापूरला पोहोचेल. -(१ सेवा)

५) नागपूर-भुसावळ-नागपूर अनारक्षित विशेष-(६ सेवा)

०१२१४ अनारक्षित विशेष १, २ आणि ३ ऑक्टोबर रोजी २१.३० वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.०० वाजता भुसावळला पोहोचेल. (३ सेवा)

०१२१३ अनारक्षित स्पेशल २, ३ आणि ४ ऑक्टोबर रोजी ०५.०० वाजता भुसावळहून सुटेल आणि त्याच दिवशी १२.२० वाजता नागपूरला पोहोचेल. (३ सेवा)

६) नाशिक रोड-नागपूर-नाशिक रोड मेमू अनारक्षित विशेष -(२ सेवा)

०१२३१ अनारक्षित मेमू विशेष नाशिक रोडवरून १ ऑक्टोबर रोजी १८.०० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी ०८.०० वाजता नागपूरला पोहोचेल. -(१ सेवा)

०१२३२ अनारक्षित मेमू विशेष नागपूरवरून २ ऑक्टोबर रोजी १६.२० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता नाशिक रोडला पोहोचेल. -(१ सेवा)

७) नाशिक रोड-नागपूर-नाशिक रोड मेमू अनारक्षित विशेष -(४ सेवा)

०१२३३ अनारक्षित मेमू विशेष नाशिक रोडवरून ३ ऑक्टोबर आणि ४ ऑक्टोबर रोजी ०४.१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १५.४० वाजता नागपूरला पोहोचेल. -(२ सेवा)

०१२३४ अनारक्षित मेमू विशेष नागपूरहून ३ ऑक्टोबर आणि ०४ ऑक्टोबर रोजी १६.२० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता नाशिक रोडला पोहोचेल. -(२ सेवा)