चंद्रपूर : जिल्हा परिषदेत ९ ते ११ मे या अवघ्या तीन दिवसात २९९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी पदभार पदभार सांभाळतच बदल्यांचा सपाटा सुरू केला असून प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या आहेत.

पंधरवड्यापूर्वी चंद्रपूर जिल्हा परिषदचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर ९ मे रोजी बदली प्रक्रिया सुरू केली. ९ ते ११ मे या तीन दिवसांत विक्रमी २९९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये पंचायत विभागातील तब्बल ७६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाला. प्रशासकीय आणि विनंती या पद्धतीने बदल्यांचे हे सत्र राबविण्यात आले. दरवर्षी मे महिन्यात जिल्हा पररिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया राबविली जाते. संवर्ग क आणि ड यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात. प्रशासकीय विनंतीच्या आधारे समुपदेशाद्वारे बदलीची प्रक्रिया राबविली जाते.

नऊ ते ११ मे या कालावधीत ही प्रक्रिया राबविण्या आली. नऊ मे रोजी शिक्षण विभाग (प्रा) ८, बांधकाम विभाग १४, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग १, वित्त विभाग १४ आणि पशुसंवर्धन विभागातील सात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. दहा मे रोजी कृषी विभाग ४, महिला व बालकल्याण ७, पंचायत विभाग ७६ आणि आपसी बदल्या चार करण्यात आल्या. ११ मे रोजी सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी ५, वरिष्ठ सहायक २३ आणि कनिष्ट सहायक ६६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक ३, आरोग्य सहायक ४, आरोग्य सहायक (स्त्री) ३, आरोग्य सेवक (पु) २३ आणि आरोग्य सेविका ३७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. प्रशासकीय १० टक्के आणि विनंतीवरून पाच टक्के बदल्या करण्यात आल्या. ही प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी नूतन सावंत यांनी दिली.