चंद्रपूर : बांबू लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूरच्या मीनाक्षी वाळके या कोण होणार करोडपती या लोकप्रिय मालिकेच्या एका विशेष भागात सहभागी झाल्या असनू शनिवार १२ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता हा भाग सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. कोण होणार करोडपती मराठीच्या मंचावर मीनाक्षी संघर्षाचा उलगडा करणार आहे.

मीनाक्षीचा प्रवास बांबू प्रशिक्षण केंद्रात बांबू हस्तकला प्रशिक्षण घेण्यापासून सुरू झाला. हा निर्णय तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरेल, याची तिला फारशी कल्पना नव्हती. बांबू कलेच्या दुनियेतील तिच्या जिद्दीमुळे तिला अनेक संधी निर्माण झाल्या. तिने आर्थिक संकटाना तोंड देत महिलांना सक्षम केले. तिच्या उल्लेखनीय कामगिरीने तिला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. या वर्षी मीनाक्षी वाल्के यांना ‘इन्स्पायरिंग इंडियन विमेन’, लंडन तर्फे ‘आयआयडब्ल्यू शी इन्स्पायर्स अवार्ड’ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार उपेक्षित पार्श्वभूमीतील स्त्रियांच्या उन्नतीसाठी तिच्या अथक समर्पणाचा पुरावा आहे. बांबू लेडी ऑफ महाराष्ट्रचा हा दुसरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. यापूर्वी तिला कॅनडाच्या इंडो-कॅनेडियन आर्ट्स अँड कल्चरल इनिशिएटिव्हने प्रतिष्ठित चुमन हिरो ही पदवी दिली होती. तिच्या कार्याची दखल घेत कोण होणार करोडपती मराठीच्या एका विशेष भागात बांबू लेडी मीनाश्री वाळके, अभिनेत्री शुभांगी गोखले, विभावरी देशपांडे यांच्या मुलाखतीचा खास भाग १२ ऑगस्टला रात्री ९ वाजता प्रसारित होत आहे.

हेही वाचा – ॲड. प्रकाश आंबेडकरांनी गडकरींवर साधला निशाणा, म्हणाले, “घोर निराशा झाली”; वाचा कारण काय आहे ते

हेही वाचा – चंद्रपूर : काँग्रेसमध्ये अंतर्गत भांडणे लावण्याचा प्रयत्न फसला, कार्यक्रमाकडे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार, आ. धोटे, अडबाले यांची पाठ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१६ ऑगस्टला चित्रपट येणार

मीनाक्षी वाळकेच्या संघर्षावर तसेच बांबू हस्तकलेमध्ये केलेल्या नाविन्यपूर्ण कार्यावर चित्रपट तयार करण्यात आला आहे. येत्या १६ ऑगस्टला मुंबईत चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे मीनाक्षी वाळके यांचे पती मुकेश वाळके यांनी सांगितले.