चंद्रपूर : महापालिका हद्दीत परवानगी न घेता अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग्स, स्टिकर्स लावणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. महापालिका आयुक्त विपीन पालीवाल यांच्या नेतृत्वात केलेल्या तपासणीमध्ये परवानगी नसलेल्या बॅनर्सची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली. काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फलक काढण्यात आले. रितसर परवानगी घेऊनच बॅनर-होर्डिंग्स लावावे, अन्यथा व्यावसायिकांना जबाबदार धरले जाईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनधिकृत बॅनर, होर्डिंग, स्टिकर्समुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि इतर समस्याही उद्भवतात. या समस्या टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी शहरातील सर्व बॅनर्स प्रिंटिंग व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. यात काही सूचना देण्यात आल्या होत्या. महापालिकेच्यावतीने १२ नोव्हेंबरला तिन्ही झोनमध्ये अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग्स, स्टिकर्सची तपासणी करण्यात आली. या तपासणीत झोन क्र. १ मध्ये ३४ बॅनर्सची तपासणी करण्यात आली, त्यापैकी १६ बॅनर्स परवानगीसह लावण्यात आले होते, तर १८ बॅनर्स परवानगीशिवाय लावण्यात आले होते.

हेही वाचा : बहिणींच्या आयुष्यात प्रकाशदीप उजळण्यासाठी बांधील, आमदार रोहित पवारांनी केले आश्वस्त

झोन क्र. २ मध्ये १६ बॅनर्स परवानगीसह लावण्यात आले होते, तर ४७ बॅनर्स परवानगीशिवाय लावण्यात आले होते. झोन क्र. ३ मध्ये ५ बॅनर्स परवानगीसह, तर १३ बॅनर्स परवानगीशिवाय लावण्यात आले होते. महापालिका हद्दीत डिजिटल पोस्टर्स, जाहिरातींचे होर्डिंग्स, बॅनर्स लावताना रितसर परवानगी घेऊन आकारण्यात येणारा कर भरणे आवश्यक असते. मात्र अनेकदा कर न भरता व परवानगीही न घेता बॅनर्स लावले जातात. याविरोधात आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. शहरात बॅनर्स लावताना त्यावर परवानगी पत्राची प्रत, प्रिंटर्स व्यावसायिक आस्थापनेचे नाव आणि कालावधी नमूद करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : नागपूर: शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा मृत्यू; आशा रुग्णालयात नातेवाईकांचा गोंधळ

परवानगीशिवाय बॅनर्स, होर्डिंग्स, स्टिकर्स लावणाऱ्यांवर महापालिका अधिनियमान्वये दंडाची तरतूद आहे. असे बॅनर्स, होर्डिंग्स, स्टिकर्स काढून टाकण्याचा खर्चही संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur city municipal commissioner vipin paliwal took action against illegal banners hoardings and stickers rsj 74 css
First published on: 14-11-2023 at 10:01 IST