चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत भाजपाचे मताधिक्य सहाही मतदारसंघांत ८७ हजार ८४७ मतांनी वाढले आहे. विशेष म्हणजे, सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, कृष्णा सहारे व कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया या भाजपच्या चार उमेदवारांनी एक लाखांपेक्षा अधिक मते घेतली, तर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार व सतिश वारजूरकर या दोनच उमेदवारांनी लाखांवर मते घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जिल्ह्यातील सर्व सहा मतदारसंघात विक्रमी मतांची आघाडी होती. मात्र आता विधानसभा निवडणुकीत भाजपाचे मताधिक्य वाढले आहे. भाजपला चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, चिमूर, वरोरा व ब्रम्हपुरी या सहा मतदारसंघात मिळून ५ लाख ६७ हजार ३५७ मते मिळाली आहे. तर काँग्रेसला या सहा मतदारसंघात ४ लाख ७९ हजार ७३५ मते मिळाली. काँग्रेस व भाजपाचे मिळून बारा उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते मिळविण्याचा मान चिमूरचे किर्तीकुमार भांगडीया यांना आहे. त्यांनी चिमूर मतदारसंघात १ लाख १६ हजार ४६५ मते मिळविली आहे. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी १ लाख १४ हजार १९६ मते घेतली आहेत. भाजपाच्या एकूण चार उमेदवारांना एक लाखांपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. यामध्ये बंटी भांगडीया यांच्या पाठोपाठ किशोर जोरगेवार यांना १ लाख ६ हजार ८४१ मते मिळाली. तर सुधीर मुनगंटीवार यांना १ लाख ५ हजार ९६९ मते मिळाली. ब्रम्हपुरीचे कृष्णा सहारे यांना १ लाख २२५ मते मिळाली. तर राजुरा येथे देवराव भोंगळे यांना ७२ हजार ८८२ मते व वरोरामध्ये करण देवतळे यांना ६५ हजार १७० मते मिळाली. दोघांनाही लाखांपेक्षा कमी मते असतानाही विजयी झाले.

हेही वाचा – ‘हैद्राबादचे पार्सल परत पाठवा’, खरेच आता तसे घडणार का ?

काँग्रेस पक्षात वडेट्टीवार यांच्या पाठोपाठ चिमूर मतदारसंघातून सतिश वारजूरकर यांना १ लाख ६ हजार ६४२ मते मिळाली. तर चंद्रपूरमधून प्रविण पडवेकर यांना ८४ हजार ३७, बल्लारपूरमधून संतोष सिंह रावत यांना ७९ हजार ९८४, राजुरामधून सुभाष धोटे यांना ६९ हजार ८२८ मते मिळाली. वरोरा येथे प्रविण काकडे यांना अवघी २५ हजार ४८ मते मिळाली. एकूणच विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वच मतदारसंघात चांगली मते मिळविली आहे.

हेही वाचा – VIDEO : वाघाच्या बछड्यांनीही घेतला कोवळ्या उन्हाचा आनंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभेच्या तुलनेत काँग्रेसला मतांच्या आघाडीत भाजपाने मागे टाकले आहे. तर ८२ उमेदवार व नोटा मिळून २ लाख ७२ हजार ४१९ मते घेतली आहेत. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला लोकसभा क्षेत्रात ७ लाख १८ हजार ४१० मते मिळाली होती तर भाजपला ४ लाख ५८ हजार ४ मते मिळाली होती. लोकसभा व सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतांची अशी काही गोळाबेरीज झाली की काँग्रेस माघारली व मतदारांनी भाजपला पसंती दिली.