चंद्रपूर : तलोधी बाळापूर येथून जवळच असलेल्या वलनी येथील सचिन वैद्य यांच्या फर्महाऊसवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून बनावट सुगंधी तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्याला सील ठोकले. यावेळी 25 लाखाची सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली असून एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे आणि पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा >>> जलवाहिनी फुटून झाले २२ दिवस, अद्याप दुरुस्ती नाही; यवतमाळमध्ये हजारो लीटर पाण्याची गळती

मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून तलोधी बाळापूर येथून जवळच असलेल्या वलनी येथे सचिन वैद्य यांच्या फर्महाऊसवर मागील अनेक दिवसांपासून बनावट सुगंधी तंबाखू तयार करण्यात येत होती. यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तुंची जमवाजमव येते करण्यात आली होती. याची माहिती येथील स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करण्याचे ठरवले. पथकाने सचिन वैद्य यांच्या फार्महाऊसवर छापा मारून बनावट सुगंधी तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्याला सील ठोकले. या कारवाईत पोलिसांनी 25 लाखाची सुगंधी तंबाखू जप्त केली आहे. तसेच कारखान्याला सील ठोकून अन्य साहित्येखील जप्त केले आहे.

हेही वाचा >>> उष्माघातामुळे दीड हजार कोंबड्यांचा मृत्यू, एकाच दिवशी शेतकऱ्याचे ५ लाखांचे नुकसान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी केलेल्या या छापेमारीमध्ये एकूण आठ आरोपींना अटक केलं आहे. सलमान आरिफ कासमनी, सागर सतीमेश्राम, रोहित धारणे, वेभव करकाडे, सागर गजभिये, वैभव भोयर, मयूर चाचेरे, खेमराज चटारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या छापेमारीत पॅकिंग साहित्य, यंत्र, इगल, माजा, हुक्का हा प्रतिबंधित तंबाखू, बनावट शिक्के व मोठ्या प्रमाणात तंबाखूचे डबे जप्त केले आहेत.