यवतमाळ : शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत योजनेंतर्गत गेल्या पाच वर्षांपासून युद्धस्तरावर जलवाहिनी, जलकुंभाची कामे सुरू आहेत. २०१८ मध्ये पूर्ण होणारी अमृत योजना २०२२ हे वर्ष संपत असतानाही अपूर्ण आहे. असे असताना या योजनेसाठी टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या ठिकठिकाणी फुटल्याने शहरात सर्वत्र गटारगंगा अवतरली आहे. येथील टिळकवाडी परिसरात गेल्या २२ दिवंसापूर्वी फुटलेली जलवाहिनी अद्यापही दुरूस्त न केल्याने या परिसरात तलावासदृश चित्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणाहून जीवन प्राधिकरणे कार्यालय केवळ ५०० फुटांवर आहे.

हेही वाचा >>> उष्माघातामुळे दीड हजार कोंबड्यांचा मृत्यू, एकाच दिवशी शेतकऱ्याचे ५ लाखांचे नुकसान

bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
water supply has been restored but complaints of water shortage are still continue
पिंपरी : पाणीपुरवठा पूर्ववत, मात्र तक्रारींचा ओघ
no water supply in most parts of Pune city on thursday due to repair works
पुणे : शहरात अघोषित पाणीकपात? पेठांचा भागवगळता उर्वरित शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

शहरातील महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाच्या (मजप्रा) मुख्य कार्यालयापासून ५०० फुटांवर असलेल्या टिळवाडीतील २२ दिवसांपूर्वी फुटलेली जलवाहिनी दुरूस्त करण्याचे सौजन्य या विभागाने अद्यापही दाखविले नाही. विदर्भ हाऊसिंगमधील मजिप्राच्या मुख्य जलकुंभातून संपूर्ण शहराला पाणी वितरण करणारी ही मुख्य आणि मोठी जलवाहिनी आहे. या २४ तास पाण्याचा अपव्यय होत असलेल्या जलवाहिनीजवळच गटार असून त्याचे घाणेरडे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. या पाणीपुरवठ्यात घाण पाणी मिसळले जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही जलवाहिनी दुरूस्त करण्यासाठी जीवन प्राधिकरणकडे अनेकांनी प्रत्यक्ष, दूरध्वनीवरून विनंती करूनही या विभागाने लक्ष दिलेले नाही. शहरात अनेक ठिकाणी या पद्धतीने जलवाहिन्या फुटलेल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी त्यांची दुरूस्ती झाली नाही तर, शहरात येत्या काळात जलजन्य आजार फैलण्याची भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा >>> ‘ज्ञानवापी’साठी रा.स्व. संघ आंदोलन करणार नाही! सरसंघचालक भागवत यांची भूमिका 

केंद्र शासनाची अमृत जलयोजना यवतमाळ शहरवासियांसाठी डोकेदुखी ठरली आहे. या योजनेसाठी राजकीय हस्तक्षेपातून निवडण्यात आलेल्या कंत्राटदाराने अनेक ठिकाणी सदोष कामे करून ठेवल्याने दोन वर्षांत पूर्ण होणारी ही योजना पाच वर्ष होत आले तरीही अपूर्ण आहे. याचा फटका जलवितरणासह नागरिकांच्या वाहतुकीवरही झाला आहे. योजनेसाठी ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने अनेक दिवस नागरिकांना त्रास सहन करावा लागला. अद्यापही अनेक मुख्य मार्गावर खड्डे कायम असल्याने अपघात घडत आहेत. सहा महिन्यांपूर्वी एक वाहनचालक मजिप्रा विभागाने खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून पाण्यात बुडून मरण पावला. तरीही हा विभाग कुंभकर्णी झोपूतन जागा झाला नाही.

खाद्यविक्रेत्यांवर महापालिका पथकाची ‘अर्थकृपा’!; लाखोंच्या उत्पन्नातील मोठा वाटा पथकाकडे?; आयटी पार्क ते माटे चौक मार्गावरील खाद्यविक्री पुन्हा सुरू

शहराला पाणीपुरवठा करणारी ४० वर्षे जुनी जलवाहिनी काढून नवीन जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र या कामात वापरलेली साधनसामग्री अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. मुख्य जलवाहिनीसह, शहरांतर्गत उपजलवाहिन्या ठिकठिकाणी फुटल्या आहेत. या गळतीमुळे दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. शहरात अनेक भागात आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नाही. पाणी सोडण्याचे कोणतेही वेळापत्रक सध्या अमलात नसल्याचे दिसते. कोणत्या भागात सलग नळ सुरू असतात तर काही भागात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे.