चंद्रपूर: उन्हाळ्याला सुरूवात होताच जिल्ह्याची तहान भागविणारे जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जिल्ह्यात जलसंकट कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एप्रिल महिन्यामध्ये ८ धरणामध्ये केवळ २६.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इरई धरण ५७.३२ टक्के पाणीसाठा शिल्लक असून एक दिवसाआड शहरात पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पावसाळ्यात जिल्ह्यातील सर्व लघु व मध्यम धरणे १०० टक्के भरतात. मात्र, उन्हाळ्याला सुरूवात होताच धरणातील पाणीसाठी कमी होण्यास सुरूवात होते. मात्र, यंदा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील धरणातील पाणीसाठी कमी झाला असल्याने शेतकरी व नागरिकांना जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे.

हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींची ८ एप्रिलला चंद्रपुरात सभा

चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम आणि मोठे जलाशय असून, असोलामेंढा आणि इराई हे दोन मोठे जलाशय आहेत. याशिवाय घोडाझरी, नालेश्वर, चांदई, चारगाव, अमलनाला, लभनसराड, पकडीगुडम आणि डोंगरगाव हे मध्यम दर्जाचे जळालेले जलाशय आहेत. पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण धरणे काठोकाठ भरले होते. यातील अनेक जलाशयातील पाणी शेतकरी शेतीसाठी वापरतात आणि काही प्रमाणात पिण्याचे पाणी म्हणूनही वापरतात.

पाटबंधारे विभागाकडून दर पंधरवड्याला पाणीसाठ्याचे पुनरावलोकन व मूल्यांकन केले जाते. या विभागाकडून एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात मूल्यांकन करण्यात आले असून, त्यानुसार धरणातील पाणीसाठा कमी झाल्याचे दिसून आले आहे. चंदई धरण कोरडा पडला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच धरणातील पाणीसाठा निम्म्याहून कमी झाला आहे. तर धरणांमध्ये केवळ २६.४९ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात जलसंकटाचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्याला दरवर्षी भीषण पाणी संकटाचा सामना करावा लागतो. अनेक तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी टँकरची मदत घ्यावी लागते. अशीच परिस्थिती यंदा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा…वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धरणातील शिल्लक पाणीसाठी

आसोंलामेंढा ३५.२८
इरई ५७.३२
घोडाझरी २८.४९
नलेश्वर २४.१८
चंदई ०.००
चारगाव ३३.७१
अमंलनाला २३.५१
लभानसराड २९.२३
पकड्डीगुड्डम ९.४९
डोंगरगाव २६.४९