नागपूर : भाजपा क्रमांक एकचा शत्रू असल्याने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार रात्रीच भाजपाबाबत उद्या काय बोलायचे हे लिहून काढतात. ते असेच काम करत राहिले तर काँग्रेसमध्ये त्यांना पुढे भविष्य आहे, अशी उपरोधिक टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – माझ्या घरात मी सोडून सगळेच डॉक्टर, मेडिकलचे निमंत्रण पत्नीनेच दिल्याने…

हेही वाचा – वाशिम : राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष हेमेंद्र ठाकरे प्रहारमध्ये; उद्या बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रवेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यानंतर त्यांना प्रसार माध्यमांशी रोज काही तरी बोलावे लागत असल्यामुळे एक दिवस आधीच रात्री ते उद्या काय बोलायचे ते लिहून काढतात, मात्र त्यांचे वक्तव्य त्यांच्याच पक्षात फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. वडेट्टीवार अत्यंत उत्साहात आहेत. ते चांगले काम करत आहेत. त्यामुळे त्यांचे स्वागत करतो आणि पुढेही त्यांनी असेच काम करावे. पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांना पाठबळ दिल्याने चंद्रयान ३ मोहीम यशस्वी झाली. त्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करणे ही नैतिकता आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी बेंगळुरूला गेले. पण विरोधी पक्षाच्या नेत्यांना ते सहन होत नाही. ६५ वर्षांत काँग्रेसने असे काही केले नाही त्यामुळे मोदी यांचा विरोध करणे हे एकमेव त्यांचे उद्दिष्ट आहे, असेही बावनकुळे म्हणाले.