नागपूर: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची जेव्हढी निंदा नालस्ती करता येईल तेव्हढी भारतीय जनता पक्षाचे नेते करतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुध्दा राहुल गांधींवर टीका करण्याची संधी सोडत नाही. मात्र शुक्रवारी नागपुरात त्यांचा सूर बदललेला दिसला.

राहुल गांधी यांच्या पहलगाम दौ-याबाबत बावनकुळे यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले “राहुल गांधी पहलगामला चालले चांगलच आहे. सर्व पक्षाने एकत्र येऊन यातून पुढे जायच आहे. देश मजबूत करायच आहे.”

पाकिस्तानी नागरिकांबाबत केंद्र सरकारने जो निर्णय घेतला आहे तो देशाकरता महत्त्वाचा आहे. या देशाला अखंड ठेवण्याकरता महत्त्वाचा आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा तंतोतंत पालन राज्य सरकार करेल, असे बावनकुळे म्हणाले.

पाणी टंचाई

नागपूर जिल्ह्यामध्ये पाण्याचा साठा मुबलक आहे. फक्त काटोल नरखेड भागामध्ये आठशे फूट खाली पाणी गेले आहे. मी जिल्हाधिकारी यांच्याकडे त्याच विषयावर चर्चा करायला आलो आहे. उद्या मी सकाळी महानगरपालिका मध्ये असणार आहे.

शहर, जिल्हा पाणीटंचाईवर काम करण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे, असे बावनकुळे म्हणाले.

श्रेय वाद नाही

महायुती मनमुटाव नाही. एकनाथ शिंदे यांनी श्रीनगरला जाऊन पर्यटकांची भेट घेणे यात काही राजकारण नाही. सरकारने गिरीश महाजन यांना पाठवले कारण ते आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत. एकनाथ शिंदे एका पक्षाचे नेते म्हणून तिथे गेले. यामध्ये काही राजकारण नाहीये काही श्रेयवाद नाही आहे. ही घटना काही श्रेयवादाची नाही.