कुनोच्या जंगलात आणखी चित्ते सोडू नका!; नामिबियातील ‘चित्ता संवर्धन निधी’चा इशारा | cheetahs from namibia kuno national park cheetah conservation fund zws 70

नागपूर : कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या खुल्या जंगलात आता आणखी चित्ते सोडल्यास आव्हानात्मक स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा नामिबियामधील ‘चित्ता संवर्धन निधी’ (चिता कन्झर्वेशन फंड) या संस्थेने दिला आहे. या संस्थेनेच नामिबियातून भारतात चित्त्यांचे स्थलांतर करण्याच्या कामात सहकार्य केले आहे.

अलीकडच्या काळात चित्त्यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रकल्पाबाबत शंका उपस्थित होत असतानाच ‘चित्ता संवर्धन निधी’नेही भारतीय अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. भारतात चित्ते पाठवण्यापूर्वी जी अपेक्षा व्यक्त केली होती, त्यापेक्षा चांगले काम होत आहे. प्रकल्प योग्य दिशेने जात आहे. मात्र त्याच वेळी उर्वरित चित्त्यांनाही कुनोच्याच जंगलात सोडले तर आणखी आव्हाने निर्माण होण्याची शक्यता संस्थेने व्यक्त केली आहे. भारतातील चित्ता प्रकल्प यशस्वी झाला असे म्हणणे खूप घाईचे होईल. आतापर्यंत भारतातील वातावरणात टिकून राहण्याचे कौशल्य चित्त्यांनी आत्मसाद केले आहे. मात्र, अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे. यादरम्यान अनेक अडथळय़ांचा सामना करावा लागेल, असा इशारा चित्ता संवर्धनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या या संस्थेने दिला आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांनी अलीकडेच चित्त्यांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारताना चित्ता संवर्धन निधी ही संस्था दीर्घकालीन यशाबाबत आशावादी असल्याचे ट्वीट केले होते. त्या पार्श्वभूमीवर संस्थेचे हे मत महत्त्वाचे मानले जात आहे.

आव्हाने काय?

* कुनो अभयारण्याची क्षमता दहा ते बारा चित्ते राहू शकतील इतकीच आहे. जास्तीत जास्त पंधरा चित्ते तेथे राहू शकतात.

* अभयारण्यात प्रती चौरस किलोमीटर २० चितळ आहेत आणि चित्त्यांच्या शिकारीसाठी पुरेसे भक्ष्य नाहीत.

* चित्त्यांना चिंकारा व इतर प्राण्यांची सवय आहे. चितळ त्यांची भूक शमवू शकत नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* कुनोमध्ये आतापर्यंत वीस चित्त्यांना स्थलांतरित करण्यात आले आहे. आणखी चित्ते सोडल्यास मानव-चित्ता संघर्ष सुरू होण्याची भीती आहे. * एक नर व एक मादी चित्ता अलीकडेच राष्ट्रीय उद्यानाची सीमा ओलांडून गावाजवळ पोहोचले होते.