नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) आपत्कालीन विभागात सोमवारी रात्री ३ वाजता एका चार वर्षीय अत्यवस्थ मुलाला नेले असता जीवनरक्षण प्रणाली नाही,असे सांगून त्याला परत पाठवण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. प्रबुद्ध पाटील असे मुलाचे नाव आहे. तो चांदूर बाजार तालुक्यातील आहे. दोन दिवसांपूर्वी प्रबुद्धला ताप आला. कुटुंबीयांनी त्याला प्रथम स्थानिक व त्यानंतर अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात हलवले. तेथील डॉक्टरांनी मुलाची प्रकृती गंभीर होत असल्याने सोमवारी रात्री नागपूर ‘मेडिकल’मध्ये उपचारासाठी पाठवले. आई उषा आणि वडील प्रवीण पाटील यांनी प्रबुद्धला मेडिकलमध्ये आणले. त्यावेळी रात्रीचे ३ वाजले होते. आपत्कालीन विभागात डॉक्टरांना दाखवले. मात्र, डॉक्टरांनी उपचार करण्याऐवजी अर्ध्या तासात इतर कोणत्याही रुग्णालयात हलवले नाही तर मुलाचा मृत्यू संभवत असल्याचे सांगितले.
स्पष्ट केल. मेडिकलमधील अनेक यंत्र बंद आहेत, जीवनरक्षण प्रणाली नाही, असे सांगून प्रबुद्धला परत पाठवले. मुलाच्या आई-वडिलांनी नाईलाजाने कार्डावर सही केली. प्रबुद्धला गांधीबाग परिसरातील एका खासगी रुग्णालयात हलवले. यासंदर्भात मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी मेडिकलमध्ये आणलेल्या मुलावर उपचार करणे आवश्यक होते. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल व दोषी आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असे सांगितले.
उपचारासाठी जास्त पैसे नसल्याने मुलाला ‘मेडिकल’मध्ये आणले. परंतु जीवनरक्षण प्रणाली नाही, यंत्र बंद असल्याचे सांगत अर्ध्या तासात उपचार सुरू न झाल्यास मुलगा दगावण्याची भीती दाखवण्यात आली. त्यामुळे मुलाला अखेर खासगी रुग्णालयात दाखल केले.
– उषा पाटील, मुलाची आई.
