नागपूर : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शनिवारी पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांचे डॉ. बाबसाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सरन्यायाधीश गवई यांनी तथागत गौतम बुध्द मुतींस अभिवादन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीचे दर्शन घेतले. तसेच अभिप्राय नोदंवहीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक व आर्थिक न्यायाचा उल्लेख केला. यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष पूज्य भंते सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत बुध्दवंदना घेण्यात आली.

आपल्या अभिप्रायात देशाचे सरन्यायाधीश म्हणतात, ‘ देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर लाखो बौध्द व आंबेडकरी अनुयायांसाठी ऊर्जेचे स्थान असलेल्या चैत्यभूमी व आज दीक्षाभूमीला भेट देताना अत्यानंद होत आहे. या पवित्रभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह बौध्द धम्म स्विकारला. यात माझे वडील दादासाहेब गवईंसह दादासाहेब कुंभारे, सदानंद फुलझेले, वासुदेवराव गाणार आदींचे बाबासाहेबांचे स्मारक व स्तुप उभारणीत मोठा वाटा होता. तथागत गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेबांचे तत्वज्ञान देशाच्या भविष्याला मार्गदर्शन करणारे आहे. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या सामाजिक व आथिंक न्यायाचा संकल्प देशाचा नागरिक म्हणून पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन’. यावेळी स्मारक समितीचे सदस्य डॉ. राजेंद्र गवई, सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, एन.आर. सुटे, भदंत नागदीपंकर, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. प्रदीप आगलावे, आनंद फुलझेले, सरन्यायाधीशांचे पुत्र ज्योतीरादित्य , शरद मेश्राम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुप्रिया सुळेंचीही भेट

राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनीही शनिवारी पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी तथागत गौतम बुध्दाच्या मुतींस अभिवादन करीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीचे दर्शन घेतले. यावेळी माजी आमदार प्रकाश गजभिये, शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, सलील देशमुख, वर्षा शामकुळे व इतर मान्यवर उपस्थित होते.