नववीत असलेल्या विद्यार्थिनीचे अश्लील फोटो इंस्टा फ्रेंडने तिच्या मैत्रिणीला आणि नातेवाईकांना पाठवले. त्यामुळे गोंधळलेल्या मुलीने आईवडिलांना प्रकार सांगितला. पोलिसांनी अहमदनगर येथील युवकावर गुन्हा दाखल केला आहे. पीडित १४ वर्षीय मुलगी स्विटी (काल्पनिक नाव) हिने आईच्या मोबाईलवर इंस्टाग्राम आयडी तयार केली.

हेही वाचा >>> उपराजधानीत पब, क्लब, हुक्का, बार आता रात्री दीडपर्यंत; २५ वर्षांखालील युवकांना मद्यबंदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिला इंस्टाग्रामवर अनिल करमड (अहमदनगर) याने रिक्वेस्ट पाठवली. इंस्टाग्रामवरून त्याने काही मँसेज केले. त्याला स्विटीने उत्तर दिले. इंस्टाग्रामवरूनच दोघांची मैत्री झाली. दोघांचे व्हिडिओ कॉल सुरु झाले. यादरम्यान त्याने तिला न्यूड फोटो पाठविण्यास सांगितले. तसेच न्यूड व्हिडिओ कॉल केला आणि स्क्रिन शॉट काढून ठेवले. काही दिवसांनंतर तिने वाद झाल्याने अनिलला बोलण्यास नकार दिला. त्यामुळे अनिलने स्विटीचे काही न्यूड फोटो तिच्या मैत्रिणीला पाठवले. त्यानंतर त्याने तिच्या काही नातेवाईकांनाही पाठवले. नातेवाईकांनी तिचे फोटो तिच्या आईला पाठवले. तिच्या आईने विचारणा केली असता ती गोंधळली. तिने आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. आईसह तिने केळवद पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.