नागपूर :  नागपूर येथून इंदूरकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाच्या काकपिटचे दार अचानक उघडले. नागपूरच्या  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली. अलीकडे कोचीन ते दिल्ली विमानाचे इमर्जन्सी लँडिंग नागपुरात करण्यात आले होते. कोचीन येथील एअर ट्रॅफिक कंट्रोल  विभागाला  बॉम्ब धमकीचा संदेश प्राप्त झाल्यानंतर तत्काळ हे विमान नागपूर विमानतळावर वळविण्यात आले. नागपूर येथे ते सुरक्षितपणे उतरले. या विमानात १५७ प्रवासी आणि सहा क्रू सदस्य प्रवास करत होते.

नागपूर येथे विमानाच्या लँडिंगअगोदर सुरक्षा यंत्रणेने चोख बंदोबस्त करुन विमान व सर्व साहित्याची तपासणी केली. प्रवाशांना तत्काळ सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षाबल अंतर्गत एअरपोर्ट सुरक्षा बल, विमानतळ बॉम्ब शोध पथक व नागपूर शहर पोलिसांचे बॉम्ब शोध पथकाने इंडिगो विमानाची आणि प्रवाशांच्या सामानाची सखोल तपासणी केली. या तपासणीत कोणतेही स्फोटक उपकरण किंवा साहित्य आढळले नाही. या घटनेदरम्यान कोणतीही जीवितहानी, मालमत्ता अथवा विमानतळाशी संबंधित नुकसान झालेले नाही. सुरक्षा तपासणीनंतर विमानाला पुढील उड्डानासाठी परवानगी देण्यात आली. सर्व १५६  प्रवासी आणि सहा क्रू सदस्यांना पुन्हा विमानात बसवून विमान नागपूरहून रवाना करण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी परत एकदा इमर्जन्सी लँडिंग करण्याची वेळ थोडक्यात टळली. नागपूर येथून इदूरकडे निघण्यास सज्ज विमानाच्या काकपिटचेदार आपोआप उघडले. वैनिकाच्या लगेच लक्षात ही बाब अली. त्याने सूचना दिली आणि विमान दुरुस्तीला पाठवण्यात आले. काकपिटचे दार दुरुस्त केल्यानंतर हे विमान इंदूर कडे रवाना झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान,इंडिगो एअरलाईन्स आणि अन्य संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून  सर्व सुरक्षा प्रक्रिया काटेकोरपणे राबवण्यात आल्या. मिहान इंडिया लिमिटेड, केंद्रीय औद्योगिक सुरक्षाबल अंतर्गत एअरपोर्ट सुरक्षा बल, विमानतळ बॉम्ब शोध पथक व नागपूर शहर पोलिसांचे बॉम्ब शोध पथक, एस आय बी,  इंडिगो एअरलाईन्स, सोनगाव पोलीस ठाणे आदी यंत्रणांनी उत्तम समन्वय साधून कारवाई पार पाडली गेली.