वर्धा: काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहीद या गावापासून होणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात ही यात्रा ३ ते १२ सप्टेंबरदरम्यान चालणार आहे. पदयात्री जनतेच्या दारात जाऊन त्यांची भेट घेणार आहे. राहुल गांधी यांच्या प्रमाणेच आम्ही समस्या जाणून घेणार असल्याचे यात्रा समन्वयक नाना गावंडे यांनी सांगितले.

या यात्रेसाठी वातावरण निर्मिती करण्याचे आदेश प्रदेश समितीने दिले आहे. सार्वत्रिक एकच स्वरूप दिसावे म्हणून पोस्टरचा नमुना जिल्हा समित्यांना पाठवण्यात आला आहे. यात कोणताही पदाधिकारी, कार्यकर्ता आपला फोटो टाकू शकतो. हे पोस्टर पदयात्रा मार्गावर लावायचे आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी दिली.

हेही वाचा… महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मिळणार जागतिक दर्जाच्या सुविधा; ‘या’ ४४ रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार, वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यातून सुरुवात होणार असल्याने गावंडे यांनी पक्षनेते माजी आमदार अमर काळे, प्रदेश प्रतिनिधी शेखर शेंडे, प्रवीण हिवरे, सुरेश ठाकरे, अमर वराडे यांच्या बैठकीत काही सूचना केल्या.