चंद्रपूर : राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपा नेते तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचे जाहीर अभिनंदन केले. २४० कोटींच्या अमृत पाणीपुरवठा योजनेचे पाणी चंद्रपूरकराना मिळत नाही म्हणून परभणीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा संतोष कन्स्ट्रक्शन कंपनीचे संतोष मुरकुटे यांच्या कंपनीला काळ्या यादीत टाकावे ही मागणी केली म्हणून हे अभिनंदन केले.

अहिर यांनी दोन दिवसांपूर्वी महापालिका व जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून अमृतचे काम किती निकृष्ठ दर्जाचे झाले आहे हे सांगितले होते. त्यावर आता विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी अहिर यांचे अभिनंदन करताना त्यांनी पूर्ण सत्य बोलावे असे म्हटले.

हेही वाचा – विवाह इच्छुक मुली हरतालिकेला गौर का घेतात? जाणून घ्या नेमके कारण…

हेही वाचा – चंद्रपूर : उपोषण मंडपात काँग्रेस व भाजपा नेते एकाच वेळी दाखल, मग झाले असे की…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेत भाजपाची सत्ता होती. साडेसात वर्षांत भाजपाने महापालिकेला अशा पद्धतीने ओरबडले हे चंद्रपूरकराना माहिती आहे. अहिर यांच्या बैठकीला महापालिकेचे तेव्हाचे पदाधिकारी व माजी नगरसेवकदेखील उपस्थित होते. या सर्वांची नार्को चाचणी केली तर सत्य बाहेर येईल. कंत्राटदारसोबतच तेदेखील किती दोषी होते हे दिसून येईल, असेही वडेट्टीवार म्हणाले.