माजी पर्यावरण मंत्री, आमदार आदित्य ठाकरे आज सोमवारी ( २२ मे ) नागपूर दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागताचे नागपूर शहरात ठिकाठिकाणी स्वागताचे बॅनर लागले आहेत. त्यात काही बॅनर लक्षवेधी ठरत आहेत. या बॅनरवर आदित्य ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे भावी मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.

अलीकडील काही महिन्यांपासून राज्यात अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांचेही काही बॅनर लागले होते. अशातच आदित्य ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असणारे बॅनर्स नागपूरात लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रपदाच्या शर्यतील आणखी एका नेत्याची भर पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : “महाविकास आघाडीत राष्ट्रवादी मोठा पक्ष, पण…”, अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

या बॅनरबाजीवर माजी मंत्री, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. वडेट्टीवार म्हणाले, “जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी… हा आमचा ओबीसींचा नारा आहे. तोच नारा महाविकास आघाडीत असणार आहे. ज्यांची संख्या जास्त त्यां चा मुख्यमंत्री होणार. हे सूत्र युतीत अनेक वर्षापासून वापरलं जात आहे.”

हेही वाचा : जयंत पाटलांची ईडी चौकशी; छगन भुजबळ म्हणाले, “लॉन्ड्रीमध्ये गुजरातहून आणलेली धुलाई पावडर…”

“समर्थकांना बॅनर लावण्याचा अधिकार आहे. अजित पवार यांच्या समर्थकांनी मध्ये बॅनर लावले होते. काही लोकांना आपला नेता मोठा व्हावा ही भावना असते. त्यामुळे बॅनरबाजी करण्यात येते. पण, महाविकास आघाडीत ज्यांचे जास्त आमदार असतील, त्यांचाच मुख्यमंत्री असणार, हेच सूत्र आहे,” असं वडेट्टीवर यांनी स्पष्ट केलं.