लोकसत्ता टीम

नागपूर: काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी आशिष दुवा यांनी नागपूर शहरातील ४०० वर्षे जुन्या मंदिराला भेट देत महादेवाचे दर्शन घेतले.

आशीष दुवा खासगी कामानिमित्त नागपूरला आले होते. शहर काँग्रेसतर्फे प्रा. दिनेश बानाबाकोडे यांनी त्यांचे स्वागत केले. शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्याची त्यांनी संवाद साधला. त्यानंतर दुवा यांनी मध्य नागपुरातील नगारखाना, महाल येथील ४०० वर्ष जुन्या कल्याणेश्वर मंदिराला भेट दिली. श्रावण मंदिर समितीचे सचिव व शहर काँग्रेसचे कमेटीचे उपाध्यक्ष प्रा. दिनेश बानाबाकोडे, सुशिल खोब्रागडे यांनी सर्व प्रथम शाल, श्रीफळ देवून त्यांचे स्वागत केले. आशीष दुवा यांनी महादेवाला अभिषेक, आरती करून एक लाख एक्कावण हजार रुद्राक्षाने बनविलेल्या शिवलिंगाची पूजा केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.