नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक नोटबंदी केली आणि त्यामुळे देशातील अर्थगती थांबली. त्याचा प्रतिकूल परिणाम व्यापारावर झाला आणि लाखो युवक बेरोजगार झाले. मोदी यांच्या नोटबंदीच्या चुकीच्या निर्णयाला सहा वर्षे झाली. त्याचे औचित्य साधून शहर काँग्रेसने नोटबंदी जाहीर झाल्याचा दिवस काळा दिवस म्हणून पाळला. शहर काँग्रेसच्या सूचनेनुसार सहा विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या चौकात कार्यकर्ते आज एकत्र आले. त्यानंतर त्यांनी मोदी सरकार आणि नोटबंदीच्या विरोधात घोषणा दिल्या. मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतलेल्या नोदबंदीच्या चुकीच्या निर्णयाला सहा वर्षे पूर्ण झाले. या निर्णयामुळे देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून गेली.

हेही वाचा >>> मोदींच्या आधीही झाली होती नोटबंदी, आजच एक हजार, पाच हजारच्या नोटा झाल्या होत्या बाद

heat waves, weather,
यंदाचा एप्रिल महिना उष्णतेच्या लाटांचा; पुढील पाच दिवस पारा आणखी वाढणार
Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Eknath Shindes Shiv Senas claim on Bhiwandi Lok Sabha
भिवंडी लोकसभेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा, कल्याणचे पडसाद भिवंडीत

नोटबंदीच्या काळात कित्येकाचे जीव गेले. अनेकांचे उद्योगधंदे उद्ध्वस्त झाले तर कित्येकांचे रोजगार गेले. त्या निषेधार्थ पश्चिम विधानसभा क्षेत्रात, काटोल रोड चौक येथे ब्लाॅक अध्यक्ष प्रमोदसिंग ठाकूर, देवेद्र रोटेले, दर्शनी धवड, दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रात उदय नगर चौक येथे प्रदेश महासचिव गिरीश पांडव यांच्या नेतृत्वाखाली, पूर्व विधानसभा क्षेत्र शांतीनगर, झाडे चौक येथे आमदार ॲड. अभिजीत वंजारी यांच्या नेतृत्वाखाली, मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात देवडिया काॅग्रेस भवन समोर ब्लाॅक अध्यक्ष अब्दुल शकील, मोतीराम मोहाडीकर प्रा. दिनेश बानाबाकोडे, रमण पैगवार यांच्या नेतृत्वाखाली, दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्र शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रतापनगर चौक येथे आणि उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रात कपिलनगर चौक येथे ब्लाॅक अध्यक्ष सूरज आवळे, सुनीता ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत निदर्शने करण्यात आली.