महाराष्ट्र हा काँग्रेसचा आहे. आम्ही आमचे लोक संभाळले नाहीत. त्यामुळे एकामागून एक नेते, कार्यकर्ते पक्षाबाहेर गेले. या व्यवस्थेला बदलण्याचं काम आपल्याला करायचं आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची स्वबळावर सत्ता येऊ शकते, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी ( १० जानेवारी ) केला. प्रदेश काँग्रेस कार्यकार्यणीची बैठक नागपुरात पार पडली. तेव्हा नाना पटोले बोलत होते.

नाना पटोले म्हणाले, “शरद पवार यांनी १९९९ साली काँग्रेसमधून बाहेर पडत नवीन पक्ष स्थापन केला. पण, काँग्रेस पक्ष स्थापनेच्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार पुण्यातील कार्यालयात गेले होते. तेव्हा शरद पवार यांनी सांगितलं की, काँग्रेसला कोणीही संपवू शकत नाही. काँग्रेसला संपवायला अनेकजण निघाले होते. ती संपली तरच आपण जिवंत राहू ही कुरघोडी सातत्याने चालते. पण, त्यांनाही मान्य करावं लागलं, काँग्रेसशिवाय पर्याय नाही आहे. राहुल गांधींच्या यात्रेनंतर लोकांचं समर्थन पुन्हा काँग्रेसला मिळत आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“काँग्रेसकडे आर्थिक, शारीरिक सर्व सक्षम लोक आहेत. मात्र, कुठं कमी पडतो हेच कळत नाही. नवी मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांत काँग्रेसला माननारा वर्ग आहे. येथे एकनाथ शिंदे यांच्यापेक्षाही ताकदीची नेते आहेत. फक्त आपल्याकडे खोके आणि धोकेवाली लोक नाही आहेत,” असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.