नागपूर : नागपुरातील काटोल रोड चौकात बुधवारी सकाळी ६.४५ वाजता एका भरधाव कंटेनरने एसटी बसला जोरदार धडक दिली. त्यात बस उलटल्याने एक प्रवासी जखमी झाला. नागपूर घाटरोड आगाराची बस क्र. एमएच- ४०, एन- ८४७२ ही काटोल नाका चौकातून सिग्नल सुरू झाल्यावर पुढे जात होती. त्याचवेळी दाभा मार्गाने येणाऱ्या भरधाव कंटेनरने सिग्नल तोडून बसच्या मागील भागाला जोरदार धडक दिली.
‘स्वाईन फ्लू’च्या आणखी १५ मृत्यूंवर शिक्कामोर्तब ; ऐन सणासुदीत वाढली चिंता
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
त्यामुळे बस उलटली. बसमध्ये नऊ प्रवासी होते. तातडीने परिसरातील नागरिकांनी धाव घेत बसमधील चालक- वाहकासह इतरही प्रवाशांना बाहेर काढले. दरम्यान एका प्रवाश्याला किरकोळ मार लागला होता. त्यालाजवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. ही बस श्रीकृष्ण लक्ष्मण शिवणकर चालवत होता. तर त्यावर वाहक म्हणून रामदास जामगडे होते.