लोकसत्ता टीम

बुलढाणा : बुलढाणा तालुक्यातील संवेदनशील स्थळ म्हणून ओळख असलेल्या धाड गावात शनिवारी रात्री उशिरा दंगल उसळली. क्षुल्लक कारणावरून दोन भिन्न धर्मीय गट एकमेकांमोर उभे ठाकल्यावर घोषणाबाजी करीत दगडफेक करण्यात आली. या संघर्षात काही जण जखमी झाले असून वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याचे वृत्त आहे. यामुळे धाड नगरीत सध्या तणावपूर्ण परिस्थिती असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Traffic police beaten, drunk youth, Pune,
पुणे : मद्यधुंद तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण, हडपसर भागातील घटना
nitin gadkari
Nitin Gadkari : करोना, दंगली, लढायांपेक्षा अधिक मृत्यू अपघातांमुळे… खुद्द गडकरींनीच…
Committee to investigate Eklavya School case takes note of student protest
एकलव्य शाळेतील प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती, विद्यार्थी आंदोलनाची दखल
27 goats die after drinking water in a cowshed near Barshi
बार्शीजवळ गोठ्यात पाणी प्यायल्यानंतर २७ शेळ्यांचा मृत्यू
Crime against developer who stalled Zhopu scheme Mumbai news
झोपु योजना रखडवणाऱ्या विकासकाविरुद्ध गुन्हा; प्रलंबित योजनांचा आढावा घेऊन कठोर कारवाई करणार
Pune, girl call center was attacked, yerawada area
पुणे : कॉलसेंटरमधील तरुणीवर सहकाऱ्याकडून कोयत्याने हल्ला, येरवडा भागातील घटना; हल्लेखोर ताब्यात

शनिवार, ३० नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा हा घटनाक्रम घडला. टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त गावात मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी शांततेत चाललेल्या या मिरवणुकीदरम्यान फटाके उडवण्यावरून दोन गटांत वाद पेटला. शाब्दिक खडाजंगी झाल्यावर धक्काबुक्की झाली. याचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. पाहतापहाता दोन्ही भिन्न धर्मीय गटाकडून तुफानी दगडफेक करण्यात आली.

आणखी वाचा-वीज केंद्रामुळे प्रदुषण, चंद्रपूरमध्ये नोव्हेंबरचे सर्व ३० दिवस प्रदूषित

मिरवणूक काढताना फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि वाद उफाळून आला. दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकले, प्रचंड राडा झाला. दोन्ही गटात दगडफेक करण्यात आली. वाहनांची जाळपोळ देखील करण्यात आली आहे. यामुळे काही वेळेतच जातीय दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. ही दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना पोलीस दल घटनास्थळी पोहोचले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे आणि जमावाला पांगवण्याचे प्रयत्न पोलिसांनी केले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी अतिरिक्त पोलीस कुमकसह धाडमध्ये डेरेदाखल झाले. दंगल घटनास्थळ, मुख्य चौकात आणि संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यामुळे आज गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आल्याचे चित्र आहे.

आणखी वाचा-‘फेइंजल’ चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानाचे गणित बदलले

अनेक खेडेगावांशी जुळलेले धाड हे गाव मोठी बाजारपेठ आहे. मात्र आज बहुतेक दुकाने बंद असून रस्त्यावर शुकशुकाट आहे. वाहतूक देखील मंदावल्याचे दिसून आले. वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात तळ ठोकून आहे.

Story img Loader