लोकसत्ता टीम

चंद्रपूर : आधीच प्रदुषित चंद्रपूर शहरात हिवाळ्यात प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषतः चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या संचातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे प्रदूषण वाढल्याची गंभीर बाब प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी समोर आली आहे. सुक्ष्म धुलिकनाचे वाढलेले प्रदूषण आरोग्यासाठी धोकादायक आहे. नोव्हेबर महिन्यातील ३० पैकीं ३० दिवस प्रदूषित होते.

shivaji nagar mumbai pollution
मुंबई : शिवाजी नगरमधील वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
mumbai High Court air pollution mumbai city
मुंबईकरांनी आणखी किती काळ धुक्याचे वातावरण पाहायचे ? वायू प्रदुषणाची समस्या कायम असल्यावरून उच्च न्यायालयाची विचारणा
health issues due to pollution in sangli news in marathi
सांगलीत ‘दत्त इंडिया’कडून जल, वायू प्रदूषण; आरोग्यास धोका निर्माण झाल्याची तक्रार
air pollution mumbai Constructions
बोरिवली, भायखळ्यातील बांधकामे निर्बंधमुक्त, गोवंडी शिवाजीनगर निरीक्षणाखाली; वायू प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांवर नजर
Why is desulfurization mandatory to reduce air pollution in thermal power plants and how much will it increase electricity prices
विश्लेषण: ‘डीसल्फरायझेशन’ हवे की वीज दरवाढ… की प्रदूषण?
Chandrapur air pollution annual statistics year 2024
चंद्रपुरातील प्रदुषणात घट; काय सांगते वार्षिक आकडेवारी? जाणून घ्या…
Health , Mumbai Municipal Corporation ,
प्रदूषण काळात व्यायाम टाळावा, मुंबई महापालिकेचा नागरिकांसाठी आरोग्य सल्ला

शहरातील प्रदूषण निर्देशांक ०-५० एक्यूआय गुड निर्देशांक आरोग्यासाठी चांगला मानला जातो. मात्र असा येथे एकही दिवस नव्हता. ५१-१०० एक्यूआय समाधानकारक निर्देशांक हा सुद्धा एकही दिवस नव्हता., १०१ -२०० एक्यूआय निर्देशांक सर्वसाधारण प्रदूषित श्रेणीत येतो. असे येथे २९ दिवस आढळले तर २०१-३०० एक्यूआय वाईट निर्देशांक असून,असा केवळ एक दिवस (१९ नोव्हेंबर) आढळला. समाधानाची बाब म्हणजे ३०१-४०० एक्यूआय अतिशय वाईट आणि ४०१-५०० एक्यूआय निर्देशांक हे धोकादायक प्रदूषणाचे मानले जाते. हे प्रदूषण येथे आढळले नाही. हवा गुणवत्ता निर्देशांक काढण्यासाठी कमीत कमी ३ तर जास्तीत जास्त ८ प्रदुषकाना प्रमाण मानले जाते. त्यात धूलिकण, २.५,१०. ओझोन,कार्बन मोनोकसाईड, सल्फर डाय ओकसाईड, नायट्रोजन डाय ओकसाईड, अमोनिया, लीड ह्या प्रदूषकांना मिळून निर्देशांक काढला जातो.

आणखी वाचा-‘फेइंजल’ चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानाचे गणित बदलले

संचात बिघाड

चंद्रपूर वीज केंद्रातील ५०० मेगाॉटचा आठव्या क्रमांकाचा संच तांत्रिकदृष्ट्या बिघाड झालेला आहे. तरीही हा संच सुरू ठेवण्यात आलेला आहे. हा संच पूर्ण क्षमतेने सुरू नाही. तरीही यातून प्रदूषण होत आहे. जिल्हाधिकारी तथा प्रदूषण नियंत्रण मंडळाने वीज केंद्राला नोटीस देवून तसेच बैठक घेवून वारंवार फटकारले आहे.

प्रदुषनाची कारणे

वाहनांची वाढती संख्या ,त्यातून निघनारा धूर ,धूळ , रस्त्यावरील धूळ,कचरा ज्वलन ,बांधकाम, स्थानिक थर्मल पॉवर उद्योग ,इत्यादी अनेक कारणांमुळे अलीकडे सर्वत्र प्रदूषनात मोठी वाढ झाली असून त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक शहरात अलीकडे विकासासाठी विविध बांधकाम, रस्ते बांधणे सुरू असते त्यातच वाहनाच्या संख्येत वाढ होत आहे.त्यातून मोठ्या प्रमाणावर धूळ आणि धूर बाहेर पडते.बहुतेक शहरात सुद्धा अश्याच समस्या निर्माण होत असल्याने प्रदूषणात सतत वाढ होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी वरून लक्षात येते अशी माहिती पर्यावरण अभ्यासक प्रा सुरेश चोपणे यांनी दिली.

Story img Loader