दुर्लक्षित केल्याची भावना सहकार गटात असतानाच शरद पवार यांचा दौरा सर्वच एकजुटीने यशस्वी करतील असा दावा, माजी खासदार सुबोध मोहिते यांनी केला आहे. सर्वच नेते आपल्या कार्यकर्त्यांसह साहेबांचा दौरा फत्ते करून दाखवतील, अशी खात्री मोहिते यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.पवार यांचा १२ फेब्रुवारीस दौरा असून व्यापारी व कार्यकर्ता मेळावा आयोजन सुबोध मोहिते यांनी केल्याचे अधिकृत दौऱ्यात नमूद आहे. त्याचे तीव्र पडसाद दौरा तयारीसाठी आयोजित सभेत उमटले. मोहिते यांच्यावर विश्वासात न घेतल्याचा आरोप झाला.

हेही वाचा >>>वाशीम: शासन निर्णयाला बगल देत जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन; मुख्यालयी न घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यास महत्व न देता मोहिते म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व नेते दौऱ्यासाठी सज्ज आहेत. कुणाचीच नाराजी नाही. भावना व्यक्त झाल्या असतील, पण कार्यक्रमास आम्ही सोबत आहे. आर्वी, हिंगणघाट व अन्य भागातील नेते पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा मोहिते यांनी केला. तर एका माजी आमदाराने पवार यांचा दौरा ‘ फेल’ करण्याचा प्रकार आत्मघातकी ठरण्याचा इशारा देऊन टाकला.