नागपूर : राज्यातील शासकीय अभियांत्रिकी, औषधनिर्माण पदवी व पदव्युतर पदवी महाविद्यालयांत तसेच लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात प्राध्यापकांची १०५ पदे निर्मिती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयामुळे आता अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांतील पदभरतीला गती येणार आहे. यामुळे हजारो इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

ग्रेड वेतन ७६०० किंवा त्यापेक्षा जास्त ग्रेड वेतनाची ही पदे असतील. यामध्ये प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विभाग प्रमुख, अधिष्ठाता, संचालक अशी विविध पदे असतील. यासाठी २३ कोटी ५२ लाख खर्चास मान्यता देण्यात आली. यामुळे लवकरच प्राध्यापक आणि अन्य पदांची भरती होणार आहे.

हेही वाचा – बुलढाणा : भरधाव दुचाकींची धडक, दोन युवक ठार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण महाविद्यालयात अनेक वर्षांपासून रिक्त पदांची ओरड होती. तसेच अनेक इच्छुक पत्रधारकांनी सरकारला पदभरतीसाठी निवेदन दिले होते. त्यानंतर आता शासनाने पदनिर्मिती करून लवकरच पदभरती होणार आहे. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे.