लोकसत्ता टीम

अकोला : शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळत नसल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या संतप्त शिवसैनिकांनी शहरातील एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात शिरून तोडफोड केली होती. या प्रकरणात खदान पोलिसांनी जिल्हा प्रमुखासह ८ ते १० शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

खदानचे ठाणेदार धनंजय सायरे यांच्या तक्रारीनुसार, शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्याच्या निषेधार्थ ९ नोव्हेंबर रोजी शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पीक विमा कंपनी कार्यालयात घुसून आंदोलन केला. महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढून घोषणाबाजी केली. खुर्च्याची तोडफोड करून नुकसान केले. तसेच जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा-अकोला : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच!

या प्रकरणात खदान पोलिसांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्यासह उपशहर प्रमुख पवन पवार, सर्कल प्रमुख सचिन बाहाकर व इतर शिवसैनिकांविरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.