बुलढाणा : आक्रमक व जहाल वक्तव्याबद्धल चर्चेत असलेले हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांच्यासह अठरा जणांविरुद्ध चिखली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. परवानगी नसताना आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रक्षोभक वक्तव्य व भाषण करून जातीय तणाव व सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> बुलढाणा जिल्ह्यातील ‘हे’ दांडीबहाद्दर नेते प्रदेश काँग्रेसच्या रडारवर; प्रदेशाध्यक्षांच्या आदेशामुळे..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिखली तालुक्यातील मकरध्वज खंडाळा येथे २६ मार्चला  रात्री उशिरा संघटनेच्या शाखा नामफलक अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी देसाई यांच्या कारवर मोठी ‘स्क्रीन’ लावून त्यावर देसाई यांचे जहाल ‘लाईव्ह’ भाषण  प्रक्षेपित करण्यात आले. तसेच जिल्हाध्यक्ष विजय पवार यांनीही प्रक्षोभक वक्तव्य केले.  चिखली पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही कार्यक्रम घेऊन जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. मकरध्वज येथील एका स्थळावरून सामाजिक तणाव असून ते प्रकरण न्यायालयात प्रविष्ट आहे. या पार्श्वभूमीवर गावात सामाजिक तेढ व जातीय तणाव निर्माण केल्याच्या आरोपावरून धनंजय देसाई, विजय पवार, राजेश पिंगळे, रामकृष्ण ठेंग, गजानन ठेंग, ज्ञानेश्वर ठेंग, मधुकर ठेंग, गजानन महाराज सपकाळ यांच्यासह एकूण १८ आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.