लोकसत्ता टीम

नागपूर : महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची स्थिती वाईट झाली असून त्यांचे हाल पाहावत नाही. त्यांची स्थिती शोले चित्रपटातील जेलरसारखी झाली आहे.. त्यांच्या मागे कोणी शिल्लक राहिलेले नाही. कोई लौटा दे मेरे बिते हुये दिन अशी त्यांची अवस्था झाली असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांना कोणी मुख्यमंत्री करण्यासाठी तयार नाही, महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाही. हे अडीच वर्षे मुख्यमंत्री झाले पण २०१९ मध्ये केलेली चूक त्यांना भावली आहे त्यामुळे आघाडीतील नेते आता धोका पत्करणार नाही. जागा वाटपावरुन उद्धव ठाकरे यांना विश्वासात घेतले जात नसल्यामुळे त्यांची स्थिती फारच वाईट झाली आणि ते पाहावत नाही. महाविकास आघाडीमध्ये त्यांना कोणी मुख्यमंत्री करण्यासाठी तयार नाही, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यासमोर मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर करण्याबाबत लोटांगण घालत आहे. मात्र आघाडीतील नेते उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही हिंदू विचाराची होती. काँग्रेस, राष्ट्रवादीचे विचार त्यांना कधी न पटणारे आहे. उद्धव ठाकरे आम्हाला सोडून शरद पवार आणि नाना पटोले सोबत गेले, आता महाविकास आघाडीवर दबाव तयार करुन आपले वजन वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना आघाडीतील नेते सहभागी करुन घेत नाही असेही पटोले म्हणाले.

आणखी वाचा-“उद्धव ठाकरेच मुख्‍यमंत्री व्‍हावेत..”, आमदार यशोमती ठाकूर यांच्‍या वक्‍तव्‍याची चर्चा

महायुतीमध्ये बहुतांश जागागबाबत निर्णय झाला असून येत्या दोन दिवसात पहिली यादी जाहीर करणार आहे. आमच्यात कुठलेच वाद नसल्यामुळे आम्ही तातडीची बैठक बोलवण्याच्या मागे पडत नाही. अशा तातडीच्या बैठका उद्धव ठाकरे घेऊ शकतात, अशी टीका बावनकुळे यांनी केली. मतदार यादीतील नावे वगळण्यावरून झालेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिउत्तर दिले.विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव दिसू लागला आहे त्यामुळे एरवी ईव्हीएमवर बोलणारे महाविकास आघाडीचे नेते मतदार यादीवर बोलू लागले आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

आणखी वाचा-पती कामावर जाताच पत्नी पैशासाठी ठेवायची ग्राहकांशी शारीरिक संबंध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकशाही मजबूत करण्यासाठी आम्ही अधिकाधिक मतदान करण्याबाबत आम्ही जनतेला आवाहन करीत असताना आमच्यावर मतदार यादीतून नावे गायब केल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यासाठी काँग्रेसचे नेते न्यायालयात गेले होते. आता उद्धव ठाकरे काँग्रेससोबत राहून ते स्वत:चा नाही काँग्रेसचा अजेंडा राबवत असल्याची टीका बावनकुळे यांनी केली. आमच्यात कुठलेच वाद नसल्यामुळे आम्ही तातडीची बैठक बोलवण्याच्या मागे पडत नाही. अशा तातडीच्या बैठका उद्धव ठाकरे घेऊ शकतात, अशी टीका बावनकुळे यांनी केली.