वर्धा : Mahashivratri 2024 Date History and Significance लहान महादेव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ढगा या तीर्थक्षेत्रावर महाशिवरात्रीस भरणाऱ्या यात्रेत विदर्भभरातून गर्दी उसळते. या पार्श्वभूमीवर प्रशासन व प्रहार संस्था व्यवस्थेसाठी सज्ज झाली आहे. कारंजा तालुक्यात येणारे श्री क्षेत्र ढगा हे धाम नदीच्या काठावर वसले आहे. प्राचीन काळात धैम्य ऋषींनी भव्य दगडात भुयार खोदून शिवलिंगाची स्थापना केल्याची आख्यायिका आहे.

त्यानंतर अनेक संत व ऋषीचे वास्तव्य राहिले. संत रामदेवबाबा यांनी चौरागडावार शिवलिंगाची स्थापना करीत बारा वर्ष तपश्चार्या करीत तिथेच समाधी घेतली. येथेच वाघाची एक गुहा आहे. हे बांबूचे दाट जंगल असून विविध जडीबुटी आढळून येतात. असे म्हणतात की येथील हवा कुष्ठ रुग्णांसाठी लाभदायी आहे. या ठिकाणी हरिहरबाबांनी अनेक अश्या रुग्णांना दुरुस्त केल्याचे गावकरी सांगतात.अलिकडच्या काळात संत हरीहरबाबा यांच्या कार्यामुळे या स्थळाचा लौकीक वाढला. महाशिवरात्रीस दोन दिवसाची यात्रा भरत असून एक लाखाच्या आसपास यात्रेकरू पोहचतात. अशी गर्दी होत असल्याने प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज असते. सोबतच मदतीला प्रहार समाज जागृती संस्थेचे व यावर्षीपासून एसएसएनजे महाविद्यालयाचे रोव्हर्स व रेंजर्स राहणार आहे. शिवलिंग दगडाच्या भुयारात असल्याने एकावेळी एकच यात्रेकरू प्रवेश करू शकतो.

हेही वाचा…चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात,”भाजपलाही एक पाय मागे घ्यावा लागू शकतो”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भक्तगण दर्शनासाठी घाई करीत असल्याने महिला, लहान मुलं तसेच वृध्दांना दर्शन घेणे अवघड ठरते. म्हणून प्रहार तर्फे सेवा प्रकल्प राबविल्या जातो. यात्रेकरूंच्या रांगा लावणे, प्रथमोपचार, पेयजल पुरवठा आदी स्वरूपात सेवा दिल्या जातात.