Nagpur Crime News : लोकांची ऑनलाईन फसवणूक करुन पैसे कमवणाऱ्या विविध टोळ्या भारतभर सक्रिय आहेत, त्यांच्यामार्फत देशभरातील लोकांना बनावट कॉल करुन, मेसेज करुन त्यांची फसवणूक केली जाते. काहीवेळा बनावट गोष्टी सांगून लोकांचे पैसे लुटले जातात. यातून अनेक जण आत्महत्याही करतात. असाच काहीसा प्रकार आता नागपूरमधून पुढे आला आहे. नागपूरमध्ये ऑनलाईन फसवणुकीतून ५१ वर्षीय व्यक्तीला ६० लाख रुपयांनी गंडा घातल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय बहेकर असं आत्महत्या केलेल्या ५१ वर्षीय नागरिकांचे नाव आहे. तो नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात फार्मासिस्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याने त्याने ५ सप्टेंबर रोजी गणेशपेठ येथील हॉटेल राजधानी येथे आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा – नागपूर : मध्यरात्री केला मेसेज, प्रेयसीची भेट अन् हत्याकांड…

हॉटल कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय बहेकरने ३ सप्टेंबर रोजी हॉटेल राजधानीमध्ये खोली बूक केली होती. त्यानंतर तो हॉटेलमध्ये दाखल झाला. मात्र, त्यानंतर दोन दिवस तो खोलीच्या बाहेरच निघाला नाही. त्यामुळे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना काही तरी गडबड असल्याची संशय आला. त्यांनी याची माहिती हॉटेलटच्या व्यवस्थापकाला दिली.

हॉटेलच्या व्यवस्थापकाने दरवाजा वाजवण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मास्टर चावीने खोलीचं दार उघडले. त्यावेळी अक्षय बहेकर त्यांना बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यांनी याची माहिती लगेच पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा – नागपूर : … अखेर गुलाबपुरीच्या गणपतीची प्रतिष्ठापना, वादग्रस्त देखाव्याची चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पोलिसांनी जेव्हा त्याच्या खोलीची तपासणी केली, तेव्हा त्यांना सुसाईड नोट मिळाली. या सुसाईड नोटमध्ये ऑनलाईन फसवणुकीतून त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झालं. याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला असून याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली.