नागपूर : मान्सून मालदीवसह दक्षिण भारत व पश्चिम श्रीलंकालगत असणाऱ्या कोमोडीन भागात दाखल झाला, पण अरबी समुद्रात चक्रीवादळसदृश्य स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. ते तयार झाले तर संपूर्ण कोकणसह महाराष्ट्र आणि गुजरातला त्याचा फटका बसू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

पाच जूनला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल आणि कमी दाबाचे क्षेत्र वाढत जाऊन सात जूनपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. स्कायमॅट या खाजगी हवामान संस्थेने जूनच्या दुसऱ्या आठवड्यात चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. तर ॲक्युवेदरच्या हवाआन अभ्यासकांच्या मते अरबी समुद्राचे तापमान चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी अनुकूल आहे. ते कोणत्या तारखेला येईल याविषयी निश्चित काही सांगता येणार नसले तरीही या चक्रीवादळाचा गुजरातसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका आहे.

plenty of water in koyna dam
विश्लेषण : राज्य दुष्काळात, तरी कोयना धरणात सुरक्षित जलसाठा कसा?
Heat wave in the state know where the heat wave warning is
राज्यात उष्णतेची लाट… जाणून घ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?
Bhiwandi lok sabha
महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?
The Meteorological Center of the Asia Pacific Economic Cooperation has predicted above-average rainfall in South Asia including India Pune news
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस ? जाणून घ्या ‘अपेक’चा अंदाज

हेही वाचा >>> Maharashtra News Live : देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावाल्यांंसाठी दिल्ली म्हणजे मक्का-मदिना: संजय राऊत

केरळ किंवा मालदीवच्या आसपास तयार होणारी चक्रीवादळे उत्तरेकडे सरकतात, पण बरेचदा अरबी समुद्रात तयार होणारे हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातकडे सरकण्याऐवजी ओमानकडे जाण्याची शक्यता असते. बरेचदा ही चक्रीवादळै समुद्रात तयार होऊन समुद्रातच विरुन जातात. मात्र, त्याचा परिणाम महाराष्ट्रासह गुजरात मध्ये होण्याची शक्यता असते. यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात आणि मुंबईमध्ये जोरदार अतिवृष्टी होऊ शकते. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर वादळ कोणत्या दिशेने सरकणार हे निश्चित होईल, असेही हवामान अभ्यासकांनी म्हटले आहे.