नागपूर: भाजप नेते, माजी मंत्री दत्ता मेघे यांचे कट्टर समर्थक, माजी महापौर रघुनाथ मालीकर, माजी नगरसेविका पुष्पा मालीकर यांच्यासह इतरहीपक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना नेते व राज्यमंत्री आशीष जयस्वाल याच्या उपस्थितीतहा पक्षप्रवेश झाला.
राष्ट्रावादीच्या स्थापनेपासून रघुनाथ मालीाकर दत्ता मेघे यांच्यासोबत होते. महापालिकेत काँग्रेस -राष्ट्रवादीची सत्ता असताना मालकीकर राष्ट्रवादीच्या कोट्यातून उपमहापौर झाले होते. त्यांच्या पत्नी पुष्पा मालीकरही राष्ट्रवादीच्या नगरसेवका होत्या. दत्ता मेघे यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतरही ते मेघे यांच्यासोबचहोते त्या नंतर मेघे भाजपमध्ये गेले. पण मालीकर भाजपमध्ये गेले नव्हते. मात्र ते मेघे यांच्याच सोबत होते.
आज त्यांनी रविभवनमध्ये सेना नेते आशीष जयस्वाल यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. लोकांची कामे करण्यासाठी शिंदे गटात प्रवेश केल्याचे मालीकर यांनी सांगितले. रविभवनमध्ये झालेल्या प्रक्षप्रवेश कार्यक्रमात मालिकर यांच्यासह ,राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका पुष्पा मालिकर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी, नगरसेवक दिलीप मडावी,विठ्ठल हेडाऊ,, विकास नागभिडे, मनसेचे मोरेश्वर धोटे,योगेश गोंडाणे, परसाराम बोकडे, ठाकरे गटाचे रामदास गुडधे, भीमराव मंदनवार, माजी नगरसेविका दुर्गा रेहवाडे, काँग्रेसच्या लक्ष्मी बैलतवार, आदिमच्या विमल पौणीकर,यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
शिवसेना वाढविण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. शिवसेना हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे. आता मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य माणसाला शिवसेना आपली वाटू लागली आहे, असे यावेळी जयस्वाल म्हणाले. यावेळी शिवसेना नागपूर शहर जिल्हाप्रमुख बंडू तळवेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राजु हरणे, उपजिल्हाप्रमुख अशोक झिंगरे, युवासेना जिल्हाप्रमुख राजेश गोमकाडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख कमलेश शरणांगत, शिवसेना वैद्यकीय सहायता कक्ष जिल्हाप्रमुख गौरव पनवेलकर यावेळी उपस्थित होते