नागपूर : नागपुरातील कुख्यात गुंडाने १७ वर्षीय मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिला जंगलात नेले व तेथे बलात्कार केला. ही खळबळजनक घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजता उघडकीस आली. अभिषेक प्रेमानंद इंदूरकर (२१, आयसी चौक) असे आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा : नागपूर : अल्पवयीन मुलीवर दोघांचा बलात्कार, पीडिता सात महिन्यांची गर्भवती

हेही वाचा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस वीस वर्षांचा कारावास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक इंदूरकर हा कुख्यात गुंड असून एका टोळाची सदस्य आहे. त्याच्यावर यापूर्वी बरेच गुन्हे दाखल असून तो अनेक दिवस मध्यवर्ती कारागृहात होता. तेथून सुटल्यानंतर तो वस्तीत गुंडगिरी करीत होता. त्याची वस्तीत दहशत असल्यामुळे  त्याला सामान्य नागरिक घाबरत होते. पोलिसांचे दुर्लक्ष होते.

  काही दिवसांपासून त्याची वाईट नजर वस्तीतील १७ वर्षांच्या मुलीवर होती. तिला रस्त्यात अडवून प्रेमाची मागणी घालत होता. त्याच्या त्रासाला मुलगी कंटाळली होती.  २१ ऑगस्टला दुपारी साडेबारा वाजता अभिषेक मुलीच्या घरी आला. त्याने मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन दुचाकीवर बसवले. तिला घेऊन तो वेलंगनी मंदिराच्या रोडवर असलेल्या जंगलात घेऊन गेला व तेथे तिच्यावर अत्याचार केला. सायंकाळच्या सुमारास तिला वस्तीजवळ आणून त्याने पळ काढला. तिने गिट्टीखदान पोलीस ठाणे गाठले. अभिषेकविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून अभिषेकला अटक केली. गिट्टीखदान पोलीस आरोपीबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देण्यास रात्री उशिरापर्यंत टाळाटाळ करीत होते. त्यामुळे पोलिसांना बलात्काराचे प्रकरण दडपायचे होते का?, असा सवाल निर्माण झाला आहे.