बुलढाणा: माजी आमदार, भाजपा नेते चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वाखालील मलकापूर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. ठेवीदारांचे पैसे यात गुंतले असल्याने बुलढाणा पाठोपाठ संभाजीनगरमध्येही आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा – अमरावतीत बिबट्याच्या मृत्यूने खळबळ: विद्यापीठ परिसरात आढळला मृतदेह

हेही वाचा – मापात पाप! खासगी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची लूट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्यंतरी कृती समितीच्या माध्यमाने ठेवीदारांनी बुलढाण्यात आंदोलन केले होते. याशिवाय विविध मार्गांनी ठेवीदारांनी अडकलेल्या ठेव्या परत मिळण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. आता आंदोलनाचे लोन संभाजीनगरमध्येही पोहोचले. छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या मलकापूर अर्बन बँकेच्या शाखेसमोर ठेवीदारांनी चांगलाच आक्रोश केला. गुलमंडी शाखेसमोर ठेवीदारांचा जमाव जमला. यावेळी संचेतींच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. ठेवीदारांच्या हातातील बॅनरवरील मजकूर लक्ष वेधणारा होता. “दे के अपने खातेदारोको दुख, क्या मिलेगा तुझे चैनसुख”? असा करडा सवाल खातेदारांनी केला आहे.