नागपूर: तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने मुख कर्करोगाचे रुग्ण वाढत आहे. त्यांच्यावर वेळीच उपचारासह या आजारावर नियंत्रणासाठी शासन सर्वसमावेशक धोरण तयार करेल. त्यासाठी निधीही दिला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील ‘पोस्ट कोविड म्युकरमायकोसिस पुनर्वसन प्रकल्प, ३ डी प्रिंटिंग युनिट, काॅम्प्रिहेन्सिव्ह डेंटिस्ट्र’ या तीन विभागांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन जीवघेणे आहे. त्यामुळेच विदर्भ ही मुख कॅन्सरची राजधानी बनली आहे. या आजारावर नियंत्रणासह रुग्णांवर उपचारासाठी शासन लवकरच धोरण तयार करेल.

हेही वाचा: नागपूर विद्यापीठ राजकारणातील चाणक्य; सर्वाधिक काळ सिनेट सदस्य राहण्याचा डॉ. राजेश भोयर यांचा विक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर म्युकरमायकोसिस हा वेदनादायी आणि जीवघेणा आजार बळावला.दंत महाविद्यालयाने डिजिटला – यझेशनची कास धरली असून येथील ३ डी प्रिंटिंग युनिटमुळे रुग्णांसाठी अचूक आकाराचे इम्प्लांट तयार करता येईल. त्यामुळे नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालय या तंत्रज्ञानाने युक्त देशातील पहिले शासकीय रुग्णालय झाल्याचे गौरवोद्गारही फडणवीस यांनी काढले. यावेळी मंचावर आमदार मोहन मते व प्रविण दटके, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, दंतचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर उपस्थित होते.