प्रशांत देशमुख, लोकसत्ता

वर्धा : येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात घडलेल्या घडामोडींनी सर्वत्र चिंतेचा सूर उमटला.रामनवमीच्या कार्यक्रमाचे निमित्त वाद निर्माण करणारे ठरले. डाव्या व हिंदू विचारसरणीच्या दोन विद्यार्थी गटात वाद झडले.आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर मोर्चेही निघाले.या तणावामुळे पोलीसांना पाचारण करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी त्याची दखल घेत विद्यापीठ व पोलीस प्रशासनाशी संवाद साधला.

हेही वाचा >>> चंद्रपूर : १२ बाजार समित्यांमध्ये २१६ जागांसाठी ८२९ अर्ज, राजकीय रणधुमाळीला सुरुवात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणाला वेगळे वळण लागू नये म्हणून काळजी घ्या. दोषींना सोडू नका. कोणीही असो त्याला माफ करू नका,असे फडणवीस यांनी बजावल्याचे सांगण्यात आले. कुलगुरू रजनीश कुमार म्हणाले, की फडणवीस यांच्याशी दोन दिवस बोलणे झाले. त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. सध्या वातावरण निवळले आहे. टीकात्मक स्वरूपाचा ‘व्हिडिओ व्हायरल’ करण्यात आला होता. त्या प्रकरणी पोलीस तक्रार झाली आहे. विशिष्ट समाजाला घेरण्यात आल्याचं आरोप चौकशीत चुकीचा ठरला, असे कुलगुरू म्हणाले. हिंदी विद्यापीठ गत काळातही विविध वादाने चर्चेत राहीले आहे. मात्र, यावेळी हिंदू विरोधी वाद चर्चेत आल्याने सर्वत्र त्याची चर्चा झाली.