अमरावती : अनेक शेतकरी कुटुंब सव्वाशे ते दीडशे वर्षांपासून लोक वळू – गायी सांभाळण्याचा छंद जोपासतात. लातूर जिल्ह्यातील हासेगाववाडी येथील माणिक निवृत्ती जाधव यांच्या घराण्याला सव्वाशे ते दीडशे वर्षांपासून ‘देवणी’ गाय व वळू सांभाळण्याचा छंद असून ही परंपरा जोपासणारी त्यांची तिसरी पिढी आहे.

येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालय परिसरात सुरू असलेल्‍या राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शनात त्‍यांची ‘देवणी’ गाय लातूर जिल्ह्याचे भूषण असून तिला आतापर्यंत पंधराच्या वर पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या गायीचे वैशिष्ठ म्हणजे मालकाने तिला दात दाखव म्हटले तर ती दात दाखविते. दिलेल्‍या ‍सर्व सूचना ती पाळते. सहा फुटांपेक्षा जास्त उंची, साडेआठ फुट लांबी आणि एक टन वजनाचा महाराष्ट्र चॅम्पियन ‘रावण’ हा देखील राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात सुलतान रेड्यासोबत सर्वांचे आकर्षण ठरला आहे.

हेही वाचा – धक्कादायक! शासकीय रुग्णालयातील जेवणात जिवंत अळ्या; अधिष्ठांतांकडून चौकशीचे आदेश

आतापर्यंत अकरा पुरस्कार मिळविणारा हा रावण म्हणजे रावण नावाचा लाल कंधारी वळू आहे. सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ जाधव हे या वळूचे मालक असून महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या प्रदर्शनात या वळूने अकरा पुरस्कार प्राप्त केले असून तो परळी जिल्हा बीड व मावळ जिल्हा पुणे येथे झालेल्या प्रदर्शनात महाराष्ट्र चॅम्पियन ठरला आहे.

हेही वाचा – अमरावतीत बच्‍चू कडूंच्‍या महत्त्वाकांक्षेला धुमारे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रदर्शनात लातूर, औरंगाबाद व मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर पशुधन आले असून पंढरपूर येथील लांब शिंगाच्या म्हशीदेखील सर्वांचे लक्ष वेधून घेतात. शेतकऱ्यांसोबतच शहरवासीयांसाठीसुद्धा या कृषी प्रदर्शनात अनेक आकर्षित करणारी दालने असून त्यांचा आनंद सर्व घेत आहेत. आकर्षक पुष्प प्रदर्शनी, ज्योती राजेश गावंडे व सुरेखा राजेश झोटिंग यांचे ‘भव्य पारंपरिक बाहुली प्रदर्शनी’ आणि खास खवैय्यांसाठी असलेले विविध पदार्थांच्‍या दालनावर गर्दी होत आहे.