नागपूर: राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर सुरू झालेल्या परंपरेनुसार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशना दरम्यान युतीच्या आमदारांची संघाच्या स्मृती मंदिर स्थळी भेट होते. त्या परंपरेनुसार आज गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप आणि शिंदे गटाचे बहुतांश सदस्यांनी रेशीमबागेतील स्मृती मंदिराला भेट देऊन आद्य सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. मात्र अजित पवार गटाचे केवळ राजू कारेमोरे वगळता मात्र अन्य कोणीही आमदार आले नाही. याची संघ परिसरात चर्चा आहे.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. चंद्रकांतदादा पाटील, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ. दादा भुसे, संजय राठोड, राम शिंदे, नितेश राणे, जयकुमार रावल, शंभूराज देसाई, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत आदी भाजपचे आणि शिंदे गटाचे मंत्री व आमदार पोहोचले. अजित पवार गटाचे आमदार कारेमोरे वगळता कोणी पोहोचले नाही. संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे मार्गदर्शन करणार आहे.

हेही वाचा – लोकजागर : मुनगंटीवार कुणाचे ‘बळी’?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – माजी केंद्रीय मंत्र्यांच्या नावाचा वापर करून युवकांची फसवणूक, काँग्रेस आमदाराचा धक्कादायक आरोप

मला पक्षाकडून सूचना नाही

मला पक्षाकडून कोणीही स्मृती मंदिर परिसरात जाऊ नये असे सांगितले नाही. मी दर्शनासाठी आलो आहे. अजित पवार यांच्याशी चर्चा करेल. तेसुद्धा येतील. या ठिकाणी भेट दिल्यावर ऊर्जा मिळते, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे म्हणाले.