नागपूर : आरक्षणाबाबत मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालून जो काही योग्य निर्णय असेल तो घेण्याचे प्रयत्न करत आहेत. जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते नागपुरात आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – नागपूर : पळून जाऊन लग्न करण्यासाठी दबाव, प्रियकराविरुद्ध प्रेयसीची पोलिसात तक्रार; बलात्काराचा गुन्हा दाखल

हेही वाचा – नागपूर : वीज कर्मचाऱ्यांनी साकारले आमचं गाव, काय आहे ‘हॅप्पी स्ट्रीट’ पहा..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांची टीम त्यांच्याबरोबर आहे. तरीही जरांगे पाटलांबरोबर असणाऱ्यांनी त्यांची काळजी घेण्याची गरज आहे. केरळ स्फोट चौकशी सुरू आहे. आपण नेहमी अलर्ट मोडवर असतो. जे काही केरळमध्ये घडले आहे. त्याची सगळी माहिती निश्चितपणे आपल्यापर्यंतदेखील पोहोचेल. मुंबई, पुण्यासारखे अत्यंत महत्त्वाचे शहर आपल्याकडे असल्याने निश्चितपणे दोन्ही ठिकाणी लक्ष ठेवावे लागते, असेही फडणवीस म्हणाले.