राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यासमोर एका व्यक्तीचा त्यांच्यावर पहिल्या दिवसापासून विश्वास असल्याचं सांगितलं. तसेच ही व्यक्ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचंही नमूद केलं. देवेंद्र फडणवीस रविवारी (११ डिसेंबर) नागपूरमध्ये समृद्धी महामार्गाचं उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमची मनापासून खूप इच्छा होती की हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हावं. २० वर्षांपूर्वी हे स्वप्न पाहिलं होतं, पण मोदी नसते तर हे केवळ स्वप्नच राहिलं असतं आणि कधीच पूर्ण झालं नसतं. मोदींनी ताकद दिली, हिंमत दिली आणि जबाबदारी दिली. त्यामुळेच आम्ही हा समृद्धी महामार्ग करू शकलो.”

“एक व्यक्ती होत ज्याचा माझ्यावर पहिल्या दिवसापासून विश्वास होता”

“अशाप्रकारचा रस्ता तयार होऊ शकतो यावर खूप कमी लोकांना विश्वास होता. मात्र, एक व्यक्ती होत ज्याचा माझ्यावर पहिल्या दिवसापासून विश्वास होता आणि तो या संकल्पनेवर काम करत होता, त्या व्यक्तीचं नाव आहे त्यावेळचे माझ्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आजचे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ते पहिल्या दिवासापासून रस्त्यावर उतरून या महामार्गासाठी काम करत होते,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“कोणतीही बँक देण्यास तयार नव्हती”

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “आम्ही सर्व पक्षांना आणि लोकप्रतिनिधिंना एकत्र केलं. सर्व पत्रकार आणि संपादकांना एकत्र केलं. त्यांच्यासमोर आम्ही समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली आणि त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिली. त्यानंतर आम्ही या कामाची सुरुवात केली. सर्वात आधी भूमीअधिग्रहणाचा महत्त्वाचा विषय होता. त्यासाठी खूप पैशांची गरज होती, मात्र कोणतीही बँक देण्यास तयार नव्हती.”

हेही वाचा : “अरे कुणाच्या बापाच्या…”, फडणवीसांच्या “तीन वर्षे स्थगितीतच वाया गेले” टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पैसे उधार घेतले आणि सर्व जमिनींचे अधिग्रहण केले”

“महाराष्ट्र सरकारचे काही अपत्ये अशी आहेत ज्यांच्याकडे खूप पैसा आहे. त्यात एमएमआरडीए, एमआयडीसी, सिडको या अपत्यांचा समावेश आहे. आम्ही त्यांना म्हटलं की, सर्व पैसा मुंबईत कमावून मुंबईतच गुंतवणूक करू नका, आता तो पैसा विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही गुंतवणूक करा. आम्ही त्यांच्याकडून पैसे उधार घेतले आणि सर्व जमिनींचे अधिग्रहण केले,” असं फडणवीसांनी नमूद केलं.