लोकसत्ता टीम

नागपूर: निवणुका जवळ आल्या की पक्षांतर सुरू होतात. एक नेता दुसऱ्या पक्षात, दुसरा तिसऱ्या पक्षात प्रवेश करतो. २०१८-१९ मध्ये अशी पक्षांतराची लाट होती, जो-तो भाजपमध्ये प्रवेश करीत होता. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतरही या पक्षाला इनकमिंग सुरूच होते.

२०२४ घ्या लोकसभा निवडणुकीने सारे चित्र पालटले. भाजपमध्ये आलेले आता मुळ पक्षात परतू लागले. माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे त्यापैकीच एक. भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांच्या राष्ट्रवादी( शरद पवार) मध्ये प्रवेशावर नागपुरात प्रतिक्रिया दिली. हर्षवर्धन पाटील भाजप सोडून तुतारी हाती घेणार याबाबत फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, “ही जुनी बातमी आहे. यात नवीन काय निवडणुकीच्या वेळी अनेक कार्यकर्ते येतात, आम्ही त्यांच्याशी भेटतो.”

आणखी वाचा-नितीन गडकरी म्हणाले “मी कमिशन घेत नाही, कामात कसूर केल्यास…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीस रविवारी नागपूरमध्ये आले. त्यांच्या हस्ते विविध मतदारसंघातील विकास कामांचे भूमिपूजन झाले. सोमवारी त्यांनी बुटीबोरी एमआयडीसीमधील दोन मोठ्या प्रकल्पांचे भूमीपूजन केले. शनिवारी फडणवीस यांच्या हस्ते नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन वास्तूंचे भूमीपूजन झाले. हे कार्यालय राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यालय असेल, असे फडणवीस म्हणाले.