यवतमाळ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने आपले छायाचित्र वापरू नये, अन्यथा न्यायालयात खेचण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकताच दिला. त्या अनुषंगाने राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी भारतीय संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत, देवाने भक्ताला मनातून काढून टाकले तरी, भक्तांच्या मनातून देव निघत नाही, असे सूचक विधान केले. पवार मानो अथवा न मानो, ते आमचे दैवतच आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कृषिमंत्री धनंजय मुंडे शुक्रवारी पुसद येथे कृषी पुरस्कार वितरणासाठी आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी मुंडे यांचे लक्ष शरद पवार यांनी छायाचित्र न वापरण्याबाबत दिलेल्या इशाऱ्याकडे वेधले असता, “शेवटी काही जरी झाले, तरी ते (शरद पवार) आमच्यासाठी देव आहेत. देवाने देवाच्या मनातून भक्ताला काढले, पण भक्ताच्या मनातला देव निघत नाही,” असे मुंडे म्हणाले.

हेही वाचा : दुचाकी चालकांच्या पाठीवर झेंडू बाम चोळण्याच्या आंदोलनाची नागपुरात चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्यांच्या विरुद्ध लढले, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले, या पवार यांच्या विधानावर, आम्ही शरद पवार साहेबांचेच अनुकरण करतोय, अशी टिप्पणी धनंजय मुंडे यांनी केली. मुंडे यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क लावले जात आहेत.