बुलढाणा : येत्या २८ एप्रिलला होऊ घातलेल्या दहा बाजार समित्यांच्या निवडणूक अत्यंत चुरशीने पार पडणार असून यानिमित्त विविध पक्षांच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. १८० जागांसाठी तब्बल ४४२ उमेदवार रिंगणात असल्याने तीव्र चुरस आहे.

बुलढाणा, चिखली, लोणार, मेहकर, देउळगावराजा, मलकापूर, जळगाव जामोद, नांदुरा, शेगाव व खामगाव बाजार समित्यांच्या प्रत्येकी १८ प्रमाणे एकूण १८० जागांसाठी ही लढत होऊ घातली आहे. माघारीच्या अंतिम मुदतीत खोऱ्याने अर्ज मागे घेण्यात आले. माघारीनंतर खामगाव ( ५३) व चिखली (५०) मध्ये सर्वाधिक उमेदवार रिंगणात आहे.

हेही वाचा – गोंदिया: बाजार समितीच्या १२६ जागांसाठी २४१ उमेदवार

याशिवाय मलकापूर ४६, जळगाव ४०, देऊळगाव राजा ४२, मेहकर ४५, लोणार ४३, नांदुरा ४६ समितीमधील उमेदवारांची संख्याही लक्षणीय आहे. या तुलनेत बुलढाणा ( ३९) व शेगाव (३८) मध्ये उमेदवारांची संख्या कमी आहे. यामुळे येथे सरळ लढत होणार आहे.

हेही वाचा – अकोला : उद्दिष्टपूर्तीमुळे हरभरा खरेदी बंद, नोंदणी करूनही १७ हजारांवर शेतकऱ्यांच्या खरेदीला ठेंगा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहकारी संस्था व ग्रामपंचायत मतदारसंघातील उमेदवारांची संख्या जास्त असल्याने या लढती अटीतटीच्या ठरणार आहे. या तुलनेत व्यापारी-अडते आणि हमाल-मापारी मतदारसंघातील उमेदवारांची संख्या मर्यादित असल्याने बहुतेक ठिकाणी सरळ लढतीची शक्यता आहे.