भंडारा : येथील चैतन्य मैदानावर आज दुपारी सुरू झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच अचानक प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मंचापुढे गोंधळ घातला. शेतकऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यास शासन असमर्थ ठरत असल्याने निषेध व्यक्त करीत विनोद वंजारी मंचापुढे आले व ‘खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देण्यास सुरवात केली.

हेही वाचा – प्रवाशांसाठी आनंदवार्ता; अमरावती-पुणे-अमरावती द्विसाप्‍ताहिक‍ विशेष एक्‍स्‍प्रेसला मुदतवाढ

हेही वाचा – नागपूर : …तर आशा वर्कर पुन्हा संपावर जाणार! सीआयटीयू म्हणते…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात जिल्हा प्रशासनाची अघोषित आणीबाणी असल्याचा आरोपही भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. एकीकडे सरकार म्हणते की आम्ही लोकांची समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्या दारी येऊन प्रश्न सोडवत आहोत आणि दुसरीकडे सरकारला कोणी प्रश्नच विचारायचे नाही म्हणून अघोषित आणीबाणी लावून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलीस अटक करत आहेत, असे पवन वंजारी यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकारामुळे पोलीस बंदोबस्त, सुरक्षा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.