लोकसत्ता टीम

नागपूर : उद्धव ठाकरे यांच्याहातून शिवसेना पक्ष गेला, असे आम्हाला अजिबात वाटत नाही. राज ठाकरे यांनी पक्ष सोडला, तेव्हाची करणे वेगळी होती आणि ती पुन्हा ऐरणीवर आणायची वेळ आणू नका, असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला.

Shinde Group Leader Criticized Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, सोनिया गांधींचे…”, शिंदे गटातल्या नेत्याची घणाघाती टीका
Jitendra Awhad sunil tatkare
“…म्हणून शरद पवार तुम्हाला भाजपाशी चर्चा करायला सांगायचे”, जितेंद्र आव्हाडांचा तटकरेंना टोला
Uday Samant, Uddhav thackeray, Uddhav thackeray working style, Uday Samant criticise Uddhav thackeray, party mla left Uddhav thackeray, victory Confidence in mahayuti, lok sabha 2024,
“…म्हणून आम्ही सगळ्यांनी शिंदेंसह उठाव केला”; उदय सामंत यांनी नागपुरात सांगितली……
udayanraje bhosale yashwantrao chavan marathi news
“यशवंतराव चव्हाणांनी संपूर्ण आयुष्य जनतेला समर्पित केले”, खासदार उदयनराजेंचे गौरवोद्गार

स्त्रीशक्ती संवाद यात्रेच्यानिमित्ताने किशोरी पेडणेकर रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्या नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत ज्यांच्यामुळे दिग्गज नेते सेनेतून बाहेर पडले, त्यांच्या हातून आता पक्ष गेला, अशी टीका केली होती. त्याला किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, “बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातून जाऊ शकत नाही. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हाची कारणे वेगळी होती. ती समोर आणायची आमच्यावर वेळ आणू नका.”

आणखी वाचा-अयोध्येतील श्रीरामासाठी वैदर्भिय कन्येने केले ‘ड्रेस डिजायनिंग’

सध्या ज्या सरकारी यंत्रणा काम करत आहे. या यंत्रणाना स्वायत्त आहे का? आमच्या नेत्यांवर ईडीची कारवाई करत दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आम्ही दबावात येणार नाही. जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहेत, त्यांचा मागे राजकीय सुडबुद्धीने यंत्रणेला लावले जात आहे. असा आरोप त्यांनी केला