नागपूर : मोठ्या शहरातील रस्ते असो की राज्य व राष्ट्रीय महामार्ग असो. प्रत्येक रस्त्यांवर दुभाजक हा असतोच. या दुभाजकावर विविध प्रकारची मात्र विशिष्ट उंचीचीच झाडे लावली जातात. रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दुभाजक तयार केला जातो. मात्र, यावर झाडेच का लावली जातात याचा कधी विचार केला आहे का?

अनेकांना वाटेल की झाडांमुळे रस्त्यावरील वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी होत असल्याने अशी शक्कल लढवली जात असेल. हे एक कारण असले तरी मुख्य कारण काही वेगळे आहे. रस्त्यावर मोठी रहदारी असते. त्यात राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर धावणाऱ्या गाड्यांची संख्याही मोठी असते. यात जड वाहनांची संख्या अधिक असते. चारचाकी वाहणे चालवताना अनेकांना समोरून येणाऱ्या वाहणांच्या लाईट्समुळे त्रास होतो. या लाईट्सचा प्रकार थेट डोळ्यांवर पडल्याने काहीवेळ समोरील दृश्य दिसत नाही. यामुळे अपघात होण्याचीही शक्यता असते. यावर उपाय म्हणून दुभाजकावर झाडे लावण्याचा प्रयोग करण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘नागपूर कलंक @9’ काय आहे? राजकीय वर्तुळात चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झाडांमुळे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वाहनांच्या लाईट्सचा प्रकाश थेट डोळ्यावर येत नाही. झाडांमुळे तो अडवला जातो. यामुळे वाहन चालवणे सोपे होते. त्यामुळे दुभाजकावर झाडे लावली जातात.