सलग दुसऱ्या दिवशी दुहेरी रुग्णसंख्या

जिल्ह्य़ात २४ तासांत एकही करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू नसून १२ नव्या रुग्णांची भर पडली आहे.

२४ तासांत १२ करोनाग्रस्तांची भर

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत एकही करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू नसून १२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. सलग दुसऱ्या दिवशी दोन आकडी रुग्णसंख्या नोंदवली गेल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

नवीन रुग्णांमध्ये शहरातील ८, ग्रामीणचे २, जिल्ह्य़ाबाहेरील २ अशा एकूण १२ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या ३ लाख ४० हजार १६६, ग्रामीण १ लाख ४६ हजार १५०, जिल्ह्य़ाबाहेरील ६,८३० अशी एकूण ४ लाख ९३ हजार १४६ रुग्णांवर पोहचली आहे. तर दिवसभरात जिल्ह्य़ात एकही मृत्यू नसल्याने शहरातील आजपर्यंतची मृत्यूसंख्या ५,८९३, ग्रामीण २,६०३, जिल्ह्य़ाबाहेरील १,६२३ अशी एकूण १०,११९ इतकी होती. तर दिवसभरात शहरात ७, जिल्ह्य़ाबाहेरील २ असे एकूण ९ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख ३४ हजार २१६, ग्रामीण १ लाख ४३ हजार ५२७, जिल्ह्य़ाबाहेरील ५,२०५ अशी एकूण ४ लाख ८२ हजार ९४८ व्यक्तींवर पोहचली आहे. करोनामुक्तांहून नवीन रुग्णसंख्या अधिक आढळल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ५७,  ग्रामीण २०, जिल्ह्य़ाबाहेरील २ अशी एकूण ७९ नोंदवली गेली. पैकी ६७ रुग्ण विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तर इतर १२ रुग्णांना दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ग्रामीणला केवळ ५२२ चाचण्या

जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात मध्यंतरी रुग्णसंख्या शून्य येत होती. परंतु आता पुन्हा कमी-अधिक रुग्ण आढळत असतानाही मंगळवारी ग्रामीण भागात केवळ ५२२, शहरात २,९८६ अशा एकूण ३,५०८ संशयितांनीच चाचणीसाठी नमुने दिले.

विदर्भात २१ करोनाग्रस्त आढळले

विदर्भात २४ तासांत एकही करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू नसून २१ नवीन रुग्णांची भर पडली. सलग दुसऱ्या दिवशी येथे रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. नागपुरात २४ तासांत १२, अमरावती १, चंद्रपूर २, गडचिरोली २, यवतमाळ १, भंडारा १, अकोला १, बुलढाणा १ असे एकूण २१ रुग्ण आढळले. तर गोंदिया, वाशीम, वर्धा या तीन जिल्ह्य़ांत एकही नवीन रुग्ण आढळला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Double number patients second day in a row coronavirus ssh